IMPIMP

PM Kisan Scheme | पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना हप्ता कसा दिला जातो, जाणून घ्यायचे आहे का?

by nagesh
Modi Government | cabinet approves interest subvention on short term agriculture loan upto rs 3 lakhs other decisions

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan Scheme । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Scheme) केंद्र सरकार (Central Government) शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर (Transfer) केली जाते, तुम्हाला माहित आहे का ? हि रक्कम कशी दिली जाते, याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे ? नसेल तर आज जाणून घेऊया.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पीएम किसान च्या (PM Kisan Scheme) वेबसाइटवर (pmkisan.gov.in) उपलब्ध माहितीनुसार, राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकार लाभार्थींचा डेटा पीएम किसान पोर्टलवर अपलोड करतात. पात्र शेतकरी गावातील पटवारी, महसूल अधिकारी किंवा इतर नियुक्त अधिकारी/एजन्सी यांच्याकडे अर्ज करू शकतात आणि त्यांना त्यांचे आवश्यक डिटेल्स द्यावे लागतात. (PM Kisan Scheme)

 

 

ब्लॉक, जिल्हा स्तरावर राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारद्वारे नियुक्त केलेले नोडल अधिकारी डेटा फॉरवर्ड करतात आणि त्यांना स्टेट नोडल ऑफिसर्स (SNOs) कडे ट्रान्सफर करतात. त्यानंतर राज्य नोडल अधिकारी डेटाचे प्रमाणीकरण करतात आणि पोर्टलवर वेळोवेळी बॅचमध्ये अपलोड करतात.राज्य नोडल ऑफिसरद्वारे अपलोड केलेला लाभार्थी डेटा अनेक टप्प्यांतून जातो जेथे तो राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NLC), सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) आणि बँकांद्वारे सत्यापित केला जातो. सत्यापित/प्रमाणित डेटावर आधारित, SNO बॅचमध्ये लाभार्थ्यांच्या रिक्वेस्ट फॉर ट्रांसफरवर (RFT) स्वाक्षरी करतात. त्यानंतर त्या निधीची रक्कम बॅचसाठी ट्रान्सफर केली जाते व पोर्टलवर अपलोड केली जाते.

 

 

तसेच आरएफटीच्या आधारावर, पीएफएमएस एफटीओ म्हणजेच फंड ट्रान्सफर ऑर्डर (Fund Transfer Order) जारी करते. FTO च्या आधारावर, कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग FTO मध्ये लिहिलेल्या रकमेसाठी मंजुरी आदेश जारी करतो. त्यानंतर ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते. या शेड्युल बँका, पोस्ट ऑफिस, ग्रामीण बँका, सहकारी बँका किंवा इतर कोणतीही वित्तीय संस्था असू शकतात. संपूर्ण प्रक्रियेतील बँकिंग व्यवहाराचे निरीक्षण आणि व्यवस्थापन हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे केले जाते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

तसेच, आता पीएम किसान अंतर्गत (PM Kisan Scheme) मदतीची रक्कम मिळविण्यासाठी ई-केवायसी (E-KYC) करणे अनिवार्य झाले आहे.
जर एखाद्या लाभार्थ्याने हे काम केले नाही तर त्याचा हप्ता सोडला जात नाही.
तथापि, अशा काही श्रेणी आहेत ज्यांना कोणत्याही परिस्थितीत पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्याचे हकदार नाहीत.

 

 

Web Title :- PM Kisan Scheme | pm kisan samman nidhi how installment is released to the beneficiaries farmers

 

हे देखील वाचा :

Bazar24 Republic Day Offer | ‘प्रजासत्ताक दिना’निमित्त मोठी ऑफर ! पुण्यातील Bazar24.store मध्ये 4000 रुपयांच्या खरेदीवर 1300 रुपयांची साडी ‘फ्री’; जाणून घ्या सविस्तर

Google Cloud | मस्तच ! आता पुण्यात गुगलमध्ये मिळणार जाॅब; लवकरच सुरु होणार नवीन कार्यालय

TET Exam Scam | TET घोटाळा प्रकरणात पुण्याच्या सायबर पोलिसांची कारवाई, OMR शीटची पडताळणी सुरु

 

Related Posts