IMPIMP

PM Modi-Sharad Pawar Meeting | पंतप्रधान मोदींसोबत कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली?; स्वत: शरद पवारांनी सांगितलं…

by nagesh
PM Modi-Sharad Pawar Meeting | What was discussed with Prime Minister Modi ?; Sharad Pawar himself said...

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Modi-Sharad Pawar Meeting | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज सकाळी पंतप्रधान कार्यालयात (Prime Minister’s Office) भेट झाली होती. यामध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत शरद पवारांनी पत्रकार परिषदत घेत खुलासा केला आहे. (PM Modi-Sharad Pawar Meeting)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एक म्हणजे, 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडला आहे, त्यावरही राज्यपालांनी निर्णय घेतला नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे नियमांनुसार काम करत नाहीत. दुसरी गोष्ट शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईची माहिती पंतप्रधानांना दिली. यावर आता योग्य ते निर्णय मोदी घेतील अशी अपेक्षा असल्याचं शरद पवार म्हणाले.

 

त्यासोबतच मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. हा मुद्दाही आपण नरेंद्र मोदींच्या निदर्शनास आणून दिल्याचं पवारांनी सांगितलं. यावेळी बोलताना, महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) राहिलेल्या अडीच वर्षाचा कार्यकाल पुर्ण करणार असल्याचं शरद पवार म्हणाले.

 

दरम्यान, राऊतांच्या घरी सेंट्रल एजन्सीने कारवाई केली हा त्यांच्यावर अन्याय आहे.
राज्यपाल आणि संजय राऊत या दोन विषयांव्यतिरिक्त इतर कोणत्याही राजकीय मुद्द्यावर चर्चा झाली नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.

 

Web Title :- PM Modi-Sharad Pawar Meeting | What was discussed with Prime Minister Modi ?; Sharad Pawar himself said…

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मंडप व्यावसायिकाला ऑनलाइन 12 लाखांचा गंडा, पुणे सायबर पोलिसांनी मुंबईतून दोघांना केली अटक

The 3 Stages of Love | प्रेमात 3 स्टेजमधून जातो तुमचा मेंदू, या स्टेजमध्ये होतो हार्मोनल स्फोट

CNG Price Hike In Pune | पुणे शहरात मध्यरात्रीपासून CNG पुन्हा 6 रुपयांनी महागणार

 

Related Posts