IMPIMP

Pune Crime | मंडप व्यावसायिकाला ऑनलाइन 12 लाखांचा गंडा, पुणे सायबर पोलिसांनी मुंबईतून दोघांना केली अटक

by nagesh
 Pune Crime | The crime branch arrested the criminal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यातील मंडप व्यावसायिकाला (Pavilion Professional) स्वस्तात पोलाद देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला 12 लाखांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणातील दोन आरोपींना पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) मुंबईतून बेड्या (Arrest) ठोकल्या (Pune Crime) आहेत. इरफान उर्फ इशान अब्दुल रेहमान खान Irfan alias Ishan Abdul Rehman Khan (वय – 38 रा. भगतसिंहनगर, गोरेगाव, मुंबई), हितेश नंदकुमार मिस्त्री Hitesh Nandkumar Mistry (वय – 45 रा. भाईंदर, ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Cyber Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

तक्रारदार यांचा मंडप व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात साहित्याची गरज असल्याने त्यानी ऑनलाईन अ‍ॅपवर (Online App) माहिती घेतली. त्यानंतर आरोपी शेख याने फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून दलाल राजेश शहा (Broker Rajesh Shah) बोलत असल्याचे सांगितले. तुम्हाला स्वस्तात पोलात मिळवून देतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी शेखने त्यांच्याकडून माल खरेदीची आगाऊ माहितीपत्र मागवून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांना आदिनाथ मेटल्स (Adinath Metals) नावाने असलेल्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार व्यावसायिकाने 12 लाख 4 हजार रुपये बँक खात्यात जमा केले. (Pune Crime)

 

 

पैसे जमा केल्यानंतर पोलाद (Steel) न मिळाल्याने फिर्यादी यांनी याबाबत चौकशी केली. त्यावेळी खात्यातील तपशील नाव बनावट असल्याचे आढळून आले. यानंर त्यांनी पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी (Pune Police) गुन्ह्याचा तपास केला असता, आरोपी शेख हा गोरेगाव भागात असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून बनावट कागदपत्रे, शिक्के, दोन मोबाईल जप्त केले. तपासामध्ये शेखने मिस्त्रीच्या पत्नीच्या बँक खात्याचा वापर केल्याचे समोर आले. याप्रकरणात पोलिसांनी शेख, मिस्त्री आणि रोनक मेहता Ronak Mehta (वय – 37 रा. वाळकेश्वर,मुंबई) यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. मेहता आजारी असल्याने त्याला नोटीस बजावली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
आर्थिक व सायबर उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke), सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले (ACP Vijaykumar Palsule),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके (Senior Police Inspector D.S. Hake)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ (PSI Anil Daffal), शिरीष गावडे, अनिल पुंडलिक, नितीन चांदणे, संदेश कर्णे, नवनाथ जाधव, प्रसाद पोतदार यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune cyber police arrest two from Mumbai fraud cheating case

 

हे देखील वाचा :

The 3 Stages of Love | प्रेमात 3 स्टेजमधून जातो तुमचा मेंदू, या स्टेजमध्ये होतो हार्मोनल स्फोट

CNG Price Hike In Pune | पुणे शहरात मध्यरात्रीपासून CNG पुन्हा 6 रुपयांनी महागणार

Varun Sardesai – ED Action On Sanjay Raut | ‘संजय राऊत आमची बुलंद तोफ, त्यांच्या एका हाकेवर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील’; वरुण सरदेसाई यांचा इशारा

 

Related Posts