IMPIMP

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार?, भाजपकडून हालचालींना वेग (Video)

by sachinsitapure
PM Narendra Modi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – देशात काही महिन्यांत लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) होणार आहेत. त्यासाठी भाजपसह इतर पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. एनडीएसह (NDA) इंडिया आघाडीच्या बैठकांचे (INDIA Alliance Meeting) सत्र सुरु झाले आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुणे लोकसभा मतदारसंघातून (Pune Lok Sabha Constituency) निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चा सुरु झाल्यानंतर पुणे भाजपच्या (Pune BJP) गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप नेते संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी या चर्चांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून पुण्यातून निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

या संदर्भात बोलताना संजय काकडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुण्यातून निवडणूक लढवली तर इतिहासात आजपर्य़ंत झाला नसेल एवढा मोठा विजय आम्ही पुण्यातून मिळवून देऊ. विरोधकांचे डिपॉझिट आम्ही जप्त करु. तसेच पंतप्रधान मोदी पुण्यातून निवडणूक लढले तर राज्यातील 48 पैकी 48 खासदार (BJP MP) आमचे निवडून येतील. राज्याचे आणि पुण्याचे भाग्य उजळेल, असेही काकडे म्हणाले.

संजय काकडे पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी पुण्यातून निवडणूक लढवली तर आम्ही रक्ताचं पाणी करुन त्यांना निवडून
आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दुसरीकडे, आज संजय काकडे यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पुण्यातून निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे.
ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशात निवडणूक लढवल्यानंतर त्याठिकाणी 90 टक्के जागांवर भाजप विजयी झाला तसेच
पुण्यात निवडणूक लढवली तर 100 टक्के जागांवर भाजपचा विजय होईल, असे संजय काकडे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर
काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Congress MLA Ravindra Dhangekar) यांनी दंड थोपटले आहेत.
त्यांनी पंतप्रधानांविरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.
यावर काकडे म्हणाले, धंगेकरांनी उभं राहावं त्यांना आमचा विरोध असण्याचे कारण नाही, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.
त्यामुळे पंतप्रधानांच्या उमेदवारीच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचे भाजपकडून सांगितले जात असताना
दुसरीकडे उमेदवारीबद्दल तयारी सुरु केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Related Posts