IMPIMP

PMC Employees News | जाहीर होऊनही अद्याप ‘बोनस’ नाही ! 7 वा वेतन आयोग नोव्हेंबर मध्ये लागू होणार; कर्मचारी हवालदिल, ‘मनपा’कडे पैसे नाहीत? कर्मचाऱ्यांचा संताप

by nagesh
Pune PMC Property Tax | Pune Municipal Corporation PMC Collects Property Tax of 939 crore in the first two months

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  PMC Employees News | महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बोनस (Diwali Bonus) अद्याप बँकेत जमा केला नाही. तसेच सातव्या वेतन आयोगानुसार (7th pay commission) ऑक्टोबरचे वेतन (PMC Employees News) होणार नसून सर्वसाधारण सभेने (Pune Corporation GB) कोव्हीड काळात उत्तम सेवा बाजावल्याने कर्मचाऱ्यांना तीन हजार रुपये बक्षीसही ‘ दिवाळीनंतर ‘ मिळणार असल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. एकीकडे विकासाच्या नावाखाली कोट्यवधींच्या प्रस्तावाना ‘धडाधड’ मंजुरी दिली जात असताना कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन आणि बोनस द्यायला पैसे ‘ शिल्लक नाहीत ‘ ? असा सवाल विशेषतः मोठ्या प्रमाणावरील चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित करत आहेत.

 

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने (Pune Corporation GB) महापालिका अधिकाऱ्यांना बोनस, सानुग्रह अनुदान आणि कोव्हीड साथीत चांगली
(PMC Employees News) सेवा बाजावल्याने 3 हजार रुपये विशेष बक्षीस देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. तसेच मागील महीन्यातच 16 तारखेला 7 वा वेतन आयोगही मंजूर झाला आहे. वेतन आयोगाची अंमलबजावणी ऑक्टोबरच्या वेतानापासून करण्यात येईल, अशी घोषणा आयुक्तांकडून करण्यात आली होती. परंतु तूर्तास तरी ऑक्टोबरच्या वेतानापासून वेतन आयोग लागू होणार नसून नोव्हेंबरचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार होईल, असे कर्मचाऱ्यांना (7th pay commission) सांगण्यात आले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

यामुळे दिवाळीचा बोनस, सानुग्रह अनुदान आणि कोविड मध्ये विशेष सेवा बजावल्याने 3 हजारांचे बक्षीस दिवाळीपूर्वी मिळेल अशी कर्मचारी वर्गाची अपेक्षा होती. परंतु बोनस आणि सानुग्रह अनुदान अद्याप बँकेत जमा केलेले नाही. तर बक्षिसाची रक्कमही ऑक्टोबर च्या वेतानामध्ये अर्थात 7 नोव्हेंबरला होंईल, असे प्रशासनाने कळविले आहे. तोपर्यंत दिवाळी देखील होऊन जाणार आहे. यामुळे कर्मचारी विशेषतः चतुर्थ श्रेणी कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

एककिडे कोट्यवधींच्या कामाच्या निविदा ‘धडाधड’ मंजूर केल्या जात असताना कर्मचाऱ्यांना बोनस आणि वेतन आयोगानुसार देण्यास प्रशासनाकडे (7th pay commission) पैसे नाहीत ? अशी प्रतिक्रिया कर्मचार्यांमधून उमटू लागली आहे.

 

Web Title : PMC Employees News | Despite the announcement, there is still no ‘bonus’! The 7th Pay Commission will take effect in November; Employees are worried, ‘Corporation’ does not have money? Employee resentment

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात घसरण तर चांदीमध्ये वाढ, जाणून घ्या आजचे भाव

Prashant Kishor | ‘पुढील अनेक वर्षे देशात BJP चे वर्चस्व राहणार, मोदींच्या शक्तीचा राहुल गांधींना अंदाज नाही’

Pune Crime | बी. जे. मेडिकल कॉलेजला 25 लाखांचा गंडा घालण्याचा प्रयत्न

 

Related Posts