IMPIMP

PMPML Tourist Bus Service | पुणेकरांसाठी पीएमपीची खास ऑफऱ; माफक दरात पाहता येणार ‘ही’ पर्यटन स्थळ

by nagesh
PMPML Tourist Bus Service | pmps special plan see religious historical places near pune for just rs 500

 पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – PMPML Tourist Bus Service | पुण्यातील बससेवा ही शहरातील अंतर्गत वाहतुकीची जीवनवाहिनी आहे. अनेक पुणेकर रोजच्या प्रवासासाठी पीएमपीएमएल (PMPML) बससेवेवर अंबलबून आहेत. आता नागरिकांना शहराजवळील धार्मिक स्थळांना सहज भेट देता येईल अशा उद्देशाने पुण्यात पर्यटन बससेवा (Puen Tourist Bus Service) सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत शहराजवळील ऐतिहासिकस्थळ आणि देवदर्शन करता येणार आहे. या सेवेचा शुभारंभ काल रविवार (दि.25) पासून करण्यात आला. पहिल्यांच दिवशी उत्साहात लोकसहभाग मिळाला. पहिल्या दिवशी 24 लोकांनी या पुणे स्थानक-रांजणगाव बससेवेचा फायदा घेतला. (PMPML Tourist Bus Service)

 

पीएमपीएमएल तर्फे पुणे आणि पिंपरी-चिंचवड (PCMC Bus) शहराजवळील सात धार्मिक आणि पर्यटन स्थळांसाठी मार्ग निश्चित केले आहेत.(Picnic Spot Near Pune) या सर्व मार्गांवर वातानुकुलित गाडीद्वारे प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी ही पर्यटन सेवा दिली जात आहे. या सेवेसाठी व्यक्तीसाठी प्रत्येकी 500 रुपये असा माफक दर असणार आहे. या सेवेची बस पुणे स्थानक येथून सकाळी 9 वाजता सुटणार असून, सायंकाळी साडेपाचला तिथेच पुणे स्थानकला (Pune Railways Station) पोहोचणार आहे. या पर्यटन सेवेसाठी प्री- बुकिंग करणे गरजेचे असणार आहे. याचे बुकिंग डेक्कन जिमखाना (Deccan Gymkhana), पुणे रेल्वे स्थानक, स्वारगेट (Swargate), कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी, महापालिका भवन (PMC) या पीएमपीच्या पास केंद्रांवर करता येणार आहे. पीएमपीएमएलच्या या पर्यटन बससेवेंतर्गत पुणे रेल्वे स्थानक, वाघेश्वर मंदिर वाघोली (Wagheshwar Temple, Wagholi), वाडेबोल्हाई, छत्रपती संभाजी महाराज समाधी मंदिर वढू बुद्रुक (Sambhaji Maharaj Samadhi Vadhu), रांजणगाव गणपती (Ranjangaon Ganpati) असा या पर्यटन सेवेचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

 

 

 

Web Title : PMPML Tourist Bus Service | pmps special plan see religious historical places near pune for just rs 500

 

Related Posts