IMPIMP

Politics of Maharashtra | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड ! विधानपरिषदेच्या निकालानंतर आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद वाढला; शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे गुजरातमध्ये

by nagesh
Cabinet Expansion | know how many independent mlas will be minister in eknath shinde and devendra fadnavis government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Politics of Maharashtra | विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2022) पुन्हा एकदा
भाजपने (BJP) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) दणका दिला आहे. भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. काल झालेल्या
निकालात काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेची (Shivsena) मतं फुटली असल्याची माहिती आहे. यानंतर आता राज्याच्या राजकारणातील (Politics
of Maharashtra) मोठी घडामोड घडताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील अंतर्गत धूसफूस उफाळून आली आहे. त्याचबरोबर शिवसेनेत फूट
पडणार का? अशी चर्चाही रंगत आहे. कारण शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या गटातील आमदारांसह नॉट
रिचेबल असल्याची माहिती आहे. शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची माहिती आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. कालच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि गट नॉट रिचेबल आहेत. काल एकनाथ शिंदे आणि गुजरातच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठकही पार पडल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे असलेल्या हॉटेलबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दाखल आहे. हे पाहता राज्याच्या राजकीय घडामोडीत मोठा भुकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Politics of Maharashtra)

 

एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल संध्याकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याचं कळत आहे. या घडामोडींमुळे महाविकास आघाडीलाच धक्का मिळण्याची शक्यता आहे. काही आमदारांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. वर्षा बंगल्यावर याची कुणकुण लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत. पण काही आमदार नॉट रिचेबल असल्याचं लक्षात आलं. शिवसेनेतील धुसफूस समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी रात्री मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान आताच्या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित राहतील का? याबाबत चर्चेला उधाण आलं आहे. हे सर्व पाहता आघाडी सरकारला धक्कातंत्राची चर्चा राज्यात पसरली आहे.

 

Web Title :- Politics of Maharashtra | shivsena leader and maharashtra minister eknath shinde at gujrat surat meridien hotel after being not reachable cm uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Sangli Crime News | खळबळजनक ! सांगली जिल्यातील एकाच कुटुंबातील 9 जणांच्या आत्महत्या प्रकरणी 25 जणांवर गुन्हा, जाणून घ्या प्रकरण

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Maharashtra Monsoon Update | राज्यातील काही भागात पावसाची दमदार हजेरी; आजही मुंबई, पुण्यात पावसाची रिपरिप सुरूच

 

Related Posts