IMPIMP

Pooja Chavan Suicide Case : पूजा चव्हाण प्रकरणी गूढ अखेर  शवविच्छेदन अहवालातुन उघडलं

by sikandershaikh
Pooja Chavan

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. कथित ऑडिओ क्लिपमध्ये असणाऱ्या व्यक्तिचा आवाज  संजय राठोड यांचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यातच पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे  फोटो  आढळले. एकूणच संशयाची सुई संजय राठोड यांच्याकडे जात होती त्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान आता या प्रकरणात आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. पूजाच्या शवविच्छेदन अहवालात जबर दुखापतीनेच पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्याचे  उघडकीस आले आहे.

वानवडी पोलिसांना पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल  प्राप्त झाला आहे त्यामध्येही प्राथमिक अहवालाप्रमाणेच जबर दुखापतीनेच पूजा चव्हाणचा मृत्यु झाल्याचं स्पष्ट होत आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या किमान मुळ कारणापर्यंत पोहोचू शकणारा सविस्तर शवविच्छेदन अहवालही पोलिसांना मिळाला आहे. शवविच्छेदन अहवालात  पूजाच्या मणक्‍याला आणि डोक्‍याला जबर दुखापत झाल्यामुळेच तिचा मृत्यु झाल्याचे कारण समोर येत आहे. मात्र याबाबत पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

तत्पूर्वी, रविवारी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंध जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर  मंत्रिपदाचा राजीनामा सोपविला. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याचे सांगतानाच या प्रकरणात विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू असल्याचा आरोप केला.

पूजाची आजी शांताबाई राठोड, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड, अरुण राठोड आणि  विलास चव्हाण यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसल्या आहेत. मात्र, पूजाच्या आई वडिलांनी शांताबाई राठोड यांचा आमच्या कुटुंबाशी कोणतेही रक्ताचे नाते नाही, असे आपल्याला सांगितले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

विरोधकांनी माझी आणि माझ्या समाजाची बदनामी केली- संजय राठोड

विरोधी पक्षाने  पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी अत्यंत घाणेरडे राजकारण करून माझी तसेच माझ्या समाजाची बदनामी केली.
राजकीय जीवनातून मला संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचे संजय राठोड यांनी आरोप केला.
मी मंत्रिपदाचा राजीनामा  पूजा मृत्यू प्रकरणाची चौकशी नि:पक्षपणे व्हावी, यासाठी दिला. सत्य काय ते बाहेर यावे.
राठोड राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही, ही विरोधकांची भूमिका घटनाविरोधी होती.
आधी चौकशी होऊ द्या, अशी भूमिका मी घेतलेली होती, पण चौकशी नि:पक्ष व्हावी, यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपविला आहे.

प्रकरण दाबण्यासाठी  दिलेत 5 कोटी रुपये

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला (Pooja Chavan Suicide Case) वेगळेच वळण लागले आहे.
पूजेची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी दिली आहे.
तसेच हे  प्रकरण दाबण्यासाठी  पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये दिले, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
शांताबाई राठोड यांनी वानवडी पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन करत पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी
गुन्हा दाखल होणार नाही, तोवर लढा सुरू ठेवला जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
करणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान सोमवारी (दि. १) शांताबाई राठोड यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राठोड म्हणाल्या, पूजाचे आणि माझे चांगले नाते होते.
तिला न्याय मिळणार नाही, तोवर लढा सुरू राहील. ५ कोटींचा  योग्यवेळी नावासहित देणार असल्याचेहि त्यांनी सांगितले.
माझ्या चुलतभावाचा अरुण राठोड हा मुलगा आहे. पूजाचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Related Posts