IMPIMP

Dilip Walse Patil | राज ठाकरेंच्या अल्टिमेटमवर गृहमंत्र्यांचा इशारा; म्हणाले – ‘राज्यातील परिस्थिती बिघडू देणार नाही, तर..’

by nagesh
Dilip Walse Patil | violation of conditions by raj thackeray will there be action home minister dilip walse patils statement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Dilip Walse Patil | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी ठाण्यातील उत्तरसभेत (MNS Uttar Sabha) बोलताना राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे 3 मे पर्यंत उतरवावे असा निर्वाणीचा इशारा दिला होता. यानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse Patil) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ‘कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यात वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण करुन देणार नाही. त्यासाठी पोलीस यंत्रणा (Maharashtra Police) सज्ज आहेत.’ असा थेट इशारा गृहमंत्री वळसे – पाटील यांनी दिला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुंबईत (Mumbai) माध्यमांशी बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले की,
”मशिदींवरील भोंग्यांना विरोध करताना ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेतला जातो, त्यामध्ये रात्री 10 ते सकाळी 6 या काळात कोणत्याही ठिकाणी लाऊडस्पीकर्स (Loudspeakers) वाजवू नयेत, असे म्हटले आहे.
ज्याठिकाणी परवानगी घेऊन भोंगे लावले आहेत, ते काढण्याचा प्रश्नच येत नाही.
न्यायालयाच्या निकालात याबाबत कोणताही उल्लेख नाही, या गोष्टीकडे गृहमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे.
तसेच, आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालणारे लोक आहोत. आमच्यासाठी सर्वजण सारखे आहेत.
पोलीस सज्ज असल्यामुळे कोणत्याही तणावाची परिस्थिती उद्भवणार नाही,” अशा आशावादही गृहमंत्री वळसे – पाटील यांनी व्यक्त केला.

 

गेल्या दोन दिवसांपुर्वी ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तर सभा पार पडली.
त्यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मशिदींच्या भोंग्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं.
3 मे म्हणजेच रमजान ईद सनाच्या आत राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे सरकारने उतरवावे असा इशारा दिला होता.
त्यामुळे वातावरण आणखी तंग झालं आहे. आता राज ठाकरे यांच्या विधानावरुन गृहमंत्री वळसे पाटील यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत केलेला दावा खोडून काढला आहे.

 

Web Title :- Dilip Walse Patil | maharashtra police are prepared to handle any situation hm dilip walse patil on mns chief raj thackeray ultimatum about loudspeakers on mosque

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! अनैतिक संबंध असल्याच्या रागातून पत्नीचा चाकूने गळा कापून खून

Devendra Fadnavis | ‘शरद पवार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधात’; देवेंद्र फडणवीसांची टीका

Ranbir-Alia Wedding | लाडक्या लेकिला वधूच्या रूपात पाहून आईचे डोळे पाणावले, अखेर ‘मुड के ना देखो दिलबरो..’ म्हणत दिला निरोप…

 

Related Posts