IMPIMP

Pune ACB Trap | 20 हजाराची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

इंदापूर : सरकारसत्ता ऑनलाइनPune ACB Trap | मोजणी केलेल्या क्षेत्राची हद्द कायम करण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय इंदापूर (Deputy Superintendent Land Records Office Indapur) येथील आवक जावक लिपिक राजाराम दत्तात्रय शिंदे Clerk Rajaram Dattatreya Shinde (वय – 54) यांना लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) रंगेहात पकडले. राजाराम शिंदे यांच्याविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात (Indapur Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पुणे एसीबीने (Pune ACB) ही कारवाई मंगळवारी (दि.14) केली. (Pune ACB Trap)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत 41 वर्षीय तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. पुणे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी 10 जून रोजी पडताळणी करुन मंगळवारी सापळा रचून ही कारवाई केली. (Pune ACB Trap)

 

तक्रारदार यांच्या चुलत्यांच्या नावाने इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथे जमीन आहे. या जमिनीच्या क्षेत्राची (Land) दोन महिन्यापूर्वी मोजणी करण्यात आली आहे. मोजणी केलेल्या क्षेत्राची हद्द कायम करण्यासाठी शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाच मागितली. तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.

 

प्राप्त तक्रारीची 10 जून रोजी पडताळणी करण्यात आली.
त्यावेळी लिपिक राजाराम शिंदे याने तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाच मागून त्यापैकी 20 हजार लाच घेण्याचे मान्य केले.
त्यानुसार मंगळवारी भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचण्यात आला.
तक्रारदार यांच्याकडून लाचेची 20 हजार रुपये रक्कम स्विकारताना राजाराम शिंदे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे (Police Inspector Sandeep Varhade) करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune ACB Trap | Clerk of land records office caught taking anti corruption bribe of Rs 20,000 Pune ACB Trap

 

हे देखील वाचा :

Pune Fire | शिवाजीनगर येथील व्यावसायिक इमारतीला आग, रेकॉर्डरुमधील सर्व कागदपत्र जळून खाक

Face Beauty Tips | बेसनसोबत मिसळा ‘या’ 4 गोष्टी, चेहर्‍यावर येईल जबरदस्त चमक; जाणून घ्या

Government Scheme | मोदी सरकारची ‘ही’ योजना बनवू शकते करोडपती, केवळ 12500 जमा केल्यास मिळतील पूर्ण 1 कोटी !

 

Related Posts