IMPIMP

Government Scheme | मोदी सरकारची ‘ही’ योजना बनवू शकते करोडपती, केवळ 12500 जमा केल्यास मिळतील पूर्ण 1 कोटी !

by nagesh
Government Scheme | ppf crorepati scheme central government how to make 1 crore rupees fund public provident fund

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाGovernment Scheme | जर तुम्हीही गुंतवणुकीसाठी सरकारी योजना शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला मोदी सरकारच्या (Modi Government) अशा योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही 1 कोटी रुपयांचा निधी तयार करू शकता. सरकारकडून सर्वसामान्यांसाठी अनेक विशेष योजना चालवल्या जातात, ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवून चांगला रिटर्न मिळवू शकता. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड Public Provident Fund (PPF) असे या योजनेचे नाव आहे. हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. ही योजना तुम्ही पोस्ट ऑफिस (Post Office) किंवा सरकारी बँकेतून घेऊ शकता (Government Scheme).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

फक्त 500 रुपयांची करू शकता गुंतवणूक

तुम्ही पीपीएफमध्ये फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. तुम्ही या खात्यात एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये आणि दरमहा जास्तीत जास्त 12,500 रुपये गुंतवू शकता. यामध्ये तुम्हाला चांगला रिटर्न मिळतो. याशिवाय व्याजदरही चांगला आहे. पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे, परंतु तुम्ही तो 5 – 5 वर्षांच्या कालावधीत वाढवू शकता.

 

किती मिळेल व्याज ?

केंद्र सरकारच्या या योजनेवर सध्या गुंतवणूकदारांना 7.1 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळत आहे. या योजनेत सरकार दर महिन्याला मार्चनंतर व्याज देते. याशिवाय, तुम्ही तुमच्या स्वत:च्या नावाने किंवा अल्पवयीन व्यक्तीचा पालक म्हणून पीपीएफ खाते उघडू शकता. (Government Scheme)

 

कर सवलतीचा लाभ

या योजनेत गुंतवणूकदारांना प्राप्तीकर सवलतीचा लाभही मिळतो. तुम्ही कलम 80सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ घेऊ शकता.

 

अशा प्रकारे मिळतील एक कोटी रुपये

या योजनेतून एक कोटी रुपये जमा करायचे असतील तर हा गुंतवणुकीचा कालावधी 25 वर्षांचा करावा लागेल.
तोपर्यंत, 1.5 लाख रुपयांच्या वार्षिक ठेवीच्या आधारावर 37,50,000 रुपये जमा केले गेले असतील, ज्यावर 7.1 टक्के वार्षिक दराने 65,58,012 रुपये व्याज मिळू शकेल. त्याच वेळी, तोपर्यंत मॅच्युरिटी रक्कम 1,03,08,012 रुपये होईल.

लक्षात घ्या की पीपीएफ खात्याची मॅच्युरिटी 15 वर्षे आहे.
जर हे खाते 15 वर्षानंतर वाढवायचे असेल तर हे खाते पुढील पाच वर्षांसाठी वाढवता येईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Government Scheme | ppf crorepati scheme central government how to make 1 crore rupees fund public provident fund

 

हे देखील वाचा :

Post Office Saving Scheme | जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या ‘या’ बचत योजनांबाबत

Indian Railways | झोपेतून उठवून ट्रेनचे तिकिट तपासू शकत नाही TTE, रेल्वे प्रवाशांना देते असेच आणखी अनेक अधिकार

LPG Gas Connection Price Hike | महागाईचा दणका ! LPG घरगुती गॅस कनेक्शन घेण्यासाठी आता मोजावे लागतील जास्त पैसे, रेग्युलेटर सुद्धा महागला

 

Related Posts