IMPIMP

Pune ACB Trap | 30 हजार रुपये लाच घेताना पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Pune ACB Trap | Junior Engineer of Pune Municipal Corporation caught in ACB's net while taking Rs 30 thousand bribe

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune ACB Trap | केलेल्या कामाचे प्रलंबित बिल मंजूर (Approved Pending Bill) करण्यासाठी पुणे
महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) पाणी पुरवठा विभागातील (Water Supply Department) कनिष्ठ अभियंत्याला (Junior
Engineer) ठेकेदाराकडून 30 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) रंगेहात
पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.13) स्वारगेट पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात करण्यात आली. व्यंकटेश लक्ष्मण पाटील Venkatesh Laxman Patil (वय-47) असे लाच घेताना पकडलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत 60 वर्षीय ठेकेदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार केली आहे. तक्रारदार हे ठेकेदार (Contractor) असून त्यांनी स्वारगेट पाणीपुरवठा विभागातील (Swargate Water Supply Department) धायरी परिसरात पाण्यासंदर्भात कामे केली आहेत. या कामांचे सुमारे चार लाख रुपये बिल थकीत असून तक्रारदार यांनी थकीत बिल मंजूर करण्याची मागणी व्यंकटेश पाटील याच्याकडे केली होती. थकीत बिल मंजूर करण्यासाठी कनिष्ठ अभियंता पाटील याने 30 हजार रुपये लाच मागितील. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB Trap) तक्रार केली.

 

पुणे एसीबीच्या पथकाने सोमवारी (दि.12) पडताळणी केली.
त्यावेळी स्वारगेट पाणी पुरवठा विभागातील धायरी प्रभाग 33 आणि 33 क परिसरात तक्रारदार यांनी पाण्यासंदर्भात कामे केली होती.
आणि या कामाचे बिल प्रलंबित होते. हे बिल मंजूर करण्यासाठी पाटील याने 30 हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले.
आज स्वारगेट पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्विकारताना व्यंकटेश पाटील याला रंगेहात पकडण्यात आले.
पाटील याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम (Prevention of Corruption Act) 7 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.
पुढील तपास पुणे पथकाचे पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे (Police Inspector Sandeep Varhade) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune ACB Trap | Junior Engineer of Pune Municipal Corporation caught in ACB’s net while taking Rs 30 thousand bribe

 

हे देखील वाचा :

Pune PMC News-PM Modi Birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्वच्छ अमृत महोत्सवाअंतर्गत इंडियन स्वच्छ लिगमध्ये पुणे महापालिकेची ‘पुणेरी नायक’ टीम सहभागी

Maharashtra Rains | शनिवारपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस; नऊ जिल्ह्यांत अतिमुसळधार

Ajit Pawar | वेदांता प्रकल्पावरुन शिवसेना-राष्ट्रवादीची सरकारवर टीका, फडणवीस रशिया दौऱ्यावर, अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

 

Related Posts