IMPIMP

Pune ACB Trap News | जामीन मिळवून देण्यासाठी लाच मागणार्‍या वकिलावर गुन्हा दाखल; तपास अधिकार्‍याला देण्यासाठी मागितले २० हजार

by sachinsitapure
Pune ACB Trap News

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune ACB Trap News | गुन्ह्यात अटक झालेल्या मुलाला लवकर जामीन मिळवून देतो, पोलीस अधिकार्‍याला द्यावे लागतील असे सांगून २० हजार रुपयांची लाच (Accepting Bribe) मागणार्‍या वकिलावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल झाला आहे. (Pune ACB Trap News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

शिवम गजानन नायकोडी Shivam Gajanan Naikodi (वय ३०, रा. जुन्नर) असे या वकिलाचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, तक्रारदार हे ७० वर्षांचे असून त्यांच्या मुलाला खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याच्या गुन्ह्यात जुन्नर पोलिसांनी (Junnar Police) अटक केली आहे. शिवम नायकोडी हे त्यांचे वकिल होते. त्यांच्या मुलाला लवकर जामीन मिळवून देतो, असे तक्रारदार यांना सांगितले. त्यासाठी तपास अधिकार्‍याला २५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची ९ डिसेंबर रोजी पडताळणी केली असता वकिलाने तपासी अधिकार्‍याला २० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून तक्रारदाराकडे पंचासमक्ष २० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. (Pune ACB Trap News)

वकिलाने लाच मागितली तरी त्यात तपासी अधिकार्‍याचा सहभाग लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला आढळून आला नाही.

लाच मागितल्यानंतर तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणीही झाली होती.
मात्र, कारवाई दरम्यान तक्रारदार यांचे १७ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यामुळे सापळा कारवाई होऊ शकली नाही.
परंतु, लाच मागितली गेली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे
(Dr Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखी पोलिस निरीक्षक रूपेश जाधव, पोलिस अंमलदार माने, कोमल शेटे आणि
चालक पोलिस हवालदार कदम यांच्या पथकाने केली आहे.

Related Posts