IMPIMP

Pune Accident News | नगर -कल्याण महामार्गावर तिहेरी अपघातात ८ जण ठार; एकाच कुटुंबावर घाला

by sachinsitapure
Nagar-Kalyan Highway

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Accident News | नगर -कल्याण महामार्गावरील (Nagar-Kalyan Highway) जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ पिकअप, रिक्षा आणि ट्रक यांच्या झालेल्या तिहेरी अपघातात (Pune Accident News) ८ जण ठार झाले. हा अपघात रविवारी रात्री ११ वाजता घडला. अपघातात दोन मुले, एक महिलेचा समावेश आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

गणेश मस्करे (वय ३०), कोमल मस्करे (वय २५), हर्षद मस्करे (वय ४) आणि काव्या मस्करे (वय ६, सर्व रा. मढ) अशी एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यु झाला आहे.

रिक्षाचालक नरेश नामदेव दिवटे (वय ६६, रा. पेडे परशुराम, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि हमाल अमोल मुकुंदा ठोखे (रा. जालना) यांचाही या अपघातात जागीच मृत्यु झाला.

भाजीपाला व्यवसाय करणारे मस्करे हे पत्नी व दोन लहान मुलांना घेऊन पीकअप घेऊन जात होते.
पिकअप ओतूरकडून कल्याणकडे जात असताना त्याने समोरुन आलेल्या रिक्षाला धडक दिली.
या धडकेनंतर पिकअप तसाच पुढे गेला व रिक्षाच्या मागून आलेल्या ट्रकला जाऊन धडकला.
या अपघातात (Pune Accident News) पिकअपमधील पाच जण आणि रिक्षामधील रिक्षाचालक व दोन प्रवासी यांचा मृत्यु झाला.
दोघा प्रवाशांची अद्याप ओळख पटली नव्हती.

अपघाताची माहिती मिळाल्यावर ओतूर पोलीस ठाण्याचे (Otur Police Station)
सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे
(API Sachin Kandge) व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आठही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी
ओतूर रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

Related Posts