Pune Accident News | पुण्यात विचित्र अपघात! अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी निघालेल्या रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक, दुहेरी अपघातात दोघांचा मृत्यू
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Accident News | पुणे-अहमदनगर महामार्ग (Pune-Ahmednagar Highway) प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातात दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यातील कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथील वाडा पुनर्वसन येथे स्विफ्ट कार आणि दुचाकीचा अपघात (Pune Accident News) झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर अपघाताची माहिती मिळताच जखमींच्या मदतीसाठी निघालेल्या रुग्णवाहिकेला (Ambulance) अपघात झाला. यामध्ये आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
स्विफ्ट कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात महेश गव्हाणे (Mahesh Gavane) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका अपघातस्थळाकडे निघाली. सणसवाडी गावच्या हद्दीत कल्पेश वनज फाट्याजवळ रुग्णवाहिकेचे चालक वैभव डोईफोडे (Vaibhav Doifode) यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रुग्णवाहिकेची धडक दुचाकीला बसली. यामध्ये श्रीकांत सुर्यकांत उबाळे (Srikanth Suryakant Ubale) यांचा मृत्यू झाला. तर रुग्णवाहिका चालकासह त्याच्या शेजारी बसलेले अक्षय रविंद्र बनसोडे (Akshay Ravindra Bansode) हे जखमी झाले आहेत. (Pune Accident News)
पुणे-नगर महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यामध्ये तरुणांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे.
महामार्गावर झालेल्या दुहेरी अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी येऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.
या दुहेरी अपघातामुळे खळबळ उडाली आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- Pune Accident News | ambulance going for help collides with bike one youth died in pune
Pimpri Crime News | अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून विनयभंग करुन दिली धमकी, दापोडी परिसरातील घटना
Nana Patole | वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीबाबत स्पष्टचं बोलले नाना पटोले; म्हणाले…
Comments are closed.