IMPIMP

Pune Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा ब्रेक फेल, कार आणि ट्रकला धडक; रस्ता दुभाजकाला रंग देणारा कर्मचारी गंभीर जखमी

by nagesh
Pune Accident | st bus car and truck accident on pune solapur highway due to break fail luckily 40 passengers survived

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने बसची धडक कार आणि ट्रकला बसली. या विचित्र अपघातात रस्ता दुभाजकाला रंग देणारा कामगार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात (Pune Accident) मंगळवारी (दि.10) थेऊर फाटा येथे सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास झाला. सुदैवाने एसटी बस चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील 40 प्रवाशांचे प्राण वाचले. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे आगाराची बस Thane ST Depot (एमएच 14 बीटी 2693) अक्कलकोट येथून ठाण्याला जात होती. यावेळी गाडीमध्ये 30 ते 40 प्रवासी प्रवास करत होते. पुण्याच्या दिशेने येत असताना थेऊर फाट्याजवळ एसटी बसचा ब्रेक अचानक फेल (Brake Fail) झाला. बसने पुढे जाणाऱ्या कार आणि ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात (Pune Accident) ट्रक आणि कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

अपघातात रस्ता दुभाजकाला रंग देणाऱा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
त्याच्या हातावरुन आणि पायावरुन गाडी गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
जखमी कामगाराला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील (Loni Kalbhor Police Station) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन महामार्गावरील वाहतुक सुरळीत केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Accident | st bus car and truck accident on pune solapur highway due to break fail luckily 40 passengers survived

 

हे देखील वाचा :

Punit Balan Celebrity League (PBCL) | मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, सुपरस्टार, दिग्गज कलाकार यांचा सहभाग असलेल्या दुसर्‍या ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धेचे १२ जानेवारी पासून आयोजन

Pune PMC WhatsApp ChatBot Services | महानगरपालिकेच्या व्हाटस अप चॅट बॉट सेवा सुरु ! PMC च्या सर्व सेवा आता ‘व्हाटस् ऍप क्र. 8888251001 वर

Maharashtra Police | सलग 63 किलोमीटर स्केटींग करुन पोलीस कॉन्स्टेबल विनोद अहिरे यांचा विक्रम

 

Related Posts