IMPIMP

Pune Amenity Space | भाजपने बहुमताच्या जोरावर वडगाव शेरीतील अ‍ॅमिनीटी स्पेस बिल्डरच्या घशात घातली ! राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार करणार

by nagesh
Pune Amenity Space | BJP Pune Amenity Space Builders Wadgaon Sheri NCP will lodge a complaint with the anti corruption bureau pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Amenity Space | वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथील अ‍ॅमिनीटी स्पेसच्या जागेवर एका बांधकाम व्यावसायीकाला शाळा बांधण्याची परवानगी देण्याचा ठराव भाजपने आज शिक्षण समितीमध्ये बहुमताच्या आधारे मंजुर करून घेतल्याने जोरदार वादळ उठले आहे. अ‍ॅमिनीटी स्पेस महापालिकेच्या (Pune Corporation) मालकिची असताना व नवीन विकास नियंत्रण नियमावली तिला लागू होत नसताना सर्वसामान्य पुणेकरांच्या हक्काची जागा बिल्डरच्या (Builders in Pune) घशात घातल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप (Corporator Subhas Jagtap) यांनी केला आहे. (Pune Amenity Space)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वडगाव शेरी येथील स. नं. १५ येथील अ‍ॅमेनिटी प्लॉट क्र. ३ वर शाळेचे आरक्षण आहे. ही जागा महापालिकेने ताब्यात घेतली आहे. या जागेवर संबधित विकसक व जागा मालक युका प्रमोटर्स एल. एल. पी. (Yuka Promoters L.L.P.) यांना शाळा बांधण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव ११ फेब्रुवारी रोजी शिक्षण समिती अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर (Corporator Manjushree Khardekar ) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत आला होता. त्यावेळी या प्रस्तावावर प्रशासनाचा अभिप्राय घ्यावा असा निर्णय घेण्यात आला. (Pune Amenity Space)

 

मात्र, स्वत: शिक्षण समिती अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, उपाध्यक्षा कालिंदा पुंडे आणि नगरसेविका वर्षा साठे (Corporator Sathe Varsha) यांनी त्याच दिवशी या निर्णयाचा फेरविचार करण्याचे पत्र देत १६ फेब्रुवारी रोजी विशेष सभेची मागणी केली.
त्यानुसार आज खर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये बहुमताने संबधित विकसकाला शाळा उभारण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला.
या प्रस्तावाला राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध केला आहे.

 

समितीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य सुभाष जगताप यांनी सांगितले की, या शिक्षण समितीच्या बैठकीला स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने हे स्वत: उपस्थित राहीले.
तसेच यावेळी बांधकाम विभागाचा एक निरीक्षकही कुठलेही निमंत्रण नसताना उपस्थित राहीला होता.
त्याने युनिफाईड डीसी रुल्सनुसार जागा मालक आरक्षण विकसित करू शकतो असे सांगितले.
परंतू ही ऍमेनिटी स्पेस युनिफाईड डीसी रुल्स लागू होण्यापुर्वी महापालिकेच्या ताब्यात आली असल्याने तिला हा नियम लागू होत नाही, असे बैठकीत निदर्शनास आणून दिल्यानंतर सगळेच गप्प झाले.
शाळा उभारणे व चालविणे ही महापालिकेची जबाबदारी असताना विकसकालाच कशी चालवायला देणार.
अशा पद्धतीने महापालिकेच्या सगळ्या इस्टेट बिल्डर्सच्या घशात जातील, पुणेकरांना सुविधा मिळणार नाहीत हे बैठकीत निदर्शनास आणून दिले.
परंतू यानंतरही रासने यांनी मतदान घ्या व बहुमताने प्रस्ताव मंजुर करा असे खर्डेकर यांना सांगितले.
खर्डेकर यांनी मतदान घेण्याचे आदेश दिल्यानंतर समितीमध्ये भाजपचे बहुमत असल्याने प्रस्ताव मंजुर करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी विरोधात मतदान केले, असे जगताप यांनी नमूद केले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ऍमेनिटी स्पेसच्या जागा खाजगी विकसकांच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव आहे.
यापुर्वीही त्यांनी ऍमेनिटी स्पेस बड्या लोकांच्या घशात घालण्याची योजना आणली होती.
आम्ही तेंव्हावी विरोध केला होता.
आता तर केवळ बहुमताचा वापर करून त्याला कुठल्याही उपसूचना देऊन शाळा, मैदानांच्या जागा बिल्डरांच्या घशात घातल्या जात आहेत.
भाजपच्या या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात येणार आहे.

 

 

– प्रशांत जगताप, शहरअध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
(- Prashant Jagtap, City President, Nationalist Congress Party)

 

Web Title :- Pune Amenity Space | BJP Pune Amenity Space Builders Wadgaon Sheri NCP will lodge a complaint with the anti corruption bureau pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अनैतिक संबंधातून महिलेचा गळा आवळून खून, मृतदेह बाथरुममध्ये टाकून फरार झालेल्या आरोपीच्या विमानतळ पोलिसांनी बिहारमधून आवळल्या मुसक्या

Corona Restrictions in India | केंद्राचे सर्व राज्यांना पत्र ! कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अनावश्यक निर्बंध दूर करा

Shivajirao Adhalrao Patil | खा. अमोल कोल्हे यांच्या घोडेस्वारीवर शिवाजीराव आढळराव पाटलांचा निशाणा; म्हणाले…

 

Related Posts