IMPIMP

Shivajirao Adhalrao Patil | खा. अमोल कोल्हे यांच्या घोडेस्वारीवर शिवाजीराव आढळराव पाटलांचा निशाणा; म्हणाले…

by nagesh
Shivajirao Adhalrao Patil | shivsena leader shivajirao adahlrao patil on ncp amol kolhe horse riding in bullcart race

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Shivajirao Adhalrao Patil | बैलगाडा शर्यतीवरून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांच्यात शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळत आहे. ‘त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी मोऱ्हं घोडी धरणार म्हणजे धरणार हा शब्द देतो,’ असं अमोल कोल्हेंनी म्हटलं होतं. आज कोल्हे यांनी घोडीवर बसून बारी मारली. यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवर टीकेची झोड उठवली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

”लिंबगाव घाटात नागरिकांची करमणूक झाली. कोल्हे यांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान जनतेला आश्वासन दिलं होतं की, बैलगाडा शर्यत ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी पहिल्या बारीसमोर हा पठ्ठ्या घोडीवर बसून बारी जिंकेल. पहिली बारी पुणे (Pune), नगर जिल्ह्याचा (Ahmednagar) विचार करता 11 आणि 12 फेब्रुवारी या दोन्ही दिवशी मावळ आणि आंबेगाव तालुक्यात संपन्न झाल्या आहेत. त्यावेळी हा पठ्ठ्या कुठे होता हे माहिती नाही. ती खरी पहिली बारी होती”. असं आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) म्हणाले.

 

”पहिली बारी म्हणजे काय ? घाटातून सुटलेला पहिला गाडा. आज हे गृहस्थ आले 12 वाजता. तोपर्यंत 100 गाडे पळाले होते. त्यामुळे ही पहिली बारी नाही. शब्द दिला, आश्वासन दिले, नाटकातील शब्दफेकी डायलॉग आहेत. गर्दीला खेचून घेणारे हे डायलॉग आहेत. यात काही तथ्य नाही. ज्यांना बैलगाडा शर्यत माहित नाही. त्यांना वाटतं अमोल कोल्हेंनी शब्द पाळला. त्यांनी शब्द पाळलेला नाही, लोकांची फसवणूक केली असल्याचं,” आढळराव पाटलांनी म्हटलं आहे.

 

”घोडीवर बसणार असा शब्द दिला होता. बैलगाड्यांच्या पुढं पळणारी घोडी कशी असते ? ती शेतकऱ्यांना माहिती आहे. बैलगाड्या पुढं धावणारी घोडी ही वेगळी असते. त्यांनी आणलेली घोडी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मालिकेमधील होती. तिला स्टुडिओमधून मुंबईतून घेऊन आले होते. ती घोडी धावण्याच्या लायकीची नव्हती. घोडी आणि खासदार बैलांच्या पाठीमागे राहिले आणि बैल पुढे गेले. त्यामुळं ही बारी फसली आहे,” असं टीकास्त्र देखील आढळराव पाटील यांनी केलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुढे बोलताना आढळराव पाटील म्हणाले, “शब्द पाळला वैगेरे हे थोतांड आहे. ही केवळ नागरिकांची फसवाफसवी आहे.
त्यांनी ही नौटंकी थांबवावी. 3 वर्षे झालं लोकांची खूप करमणूक केली आहे.
3 वर्षे त्यांनी नागरिकांची निराशा केली आहे, तसेच, कोल्हे यांची बारी फसली असून हे वरातीमागून घोडं तशी ही बैला मागून घोडी.
बैलांच्या पुढं पळायच तर घोडी माग पळत होती.
मग घोडी पळवायची कशाला ? शूटिंग आणि फोटोसाठी, घोडीवर बसायचं होतं का ? तसं असत तर शेतकऱ्यांची घोडी आणून बसायचं होतं’.” असं ते म्हणाले.

 

Web Title :- Shivajirao Adhalrao Patil | shivsena leader shivajirao adahlrao patil on ncp amol kolhe horse riding in bullcart race

 

हे देखील वाचा :

BJP MLA | योगी आदित्यनाथ यांना मत दिलं नाहीतर घरे पाडू; भाजप आमदाराची धमकी

Sanjay Raut | ‘माझा कोणाच्या खुर्चीवर डोळा नाही तर…’; संजय राऊतांचं राणेंना प्रत्युत्तर

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 161 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts