IMPIMP

Pune Bus Fire | नाशिकनंतर पुण्यात खासगी बस पेटली, बस चालकाच्या तत्परतेमुळे 27 प्रवासी बचावले

by nagesh
Pune Bus Fire | bus carrying devotees from bhiwandi caught fire at ghodegaon bhimashankar road

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन नाशिकमध्ये खासगी बसला आग (Nashik Bus Fire) लागल्याची घटना ताजी असतानाच भीमाशंकर (Bhimashankar) येथे प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी बसला आग (Pune Bus Fire) लागल्याची धक्कादयक घटना समोर आली आहे. भिमाशंकर रोडवर शिंदे वाडी येथे ही घटना बुधवारी पहाटे घडली आहे. भिवंडीतील भाविकांना दर्शनासाठी घेऊन जात असताना ही घटना (Pune Bus Fire) घडली. बसमधील प्रवासी आणि चालक तत्परतेने बाहेर पडल्याने जीविहताहीन टळली. मात्र आगीत प्रवाशांचे साहित्य आणि बस भस्मसात झाली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातील पाया गावातील 27 भाविक दर्शनासाठी भीमाशंकर येथे निघाले होते. बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घोडेगाव ते भीमाशंकर रस्त्यावर शिंदेवाडीत भाविकांच्या बसने अचानक पेट (Pune Bus Fire) घेतला. बसचालक बाबू बसप्पा सुरपूर Bus Driver Babu Basappa Surpur (वय-30 रा. कल्याण, सोनारपाडा, जि. ठाणे) यांनी तत्परतेने प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. काही वेळातच आग भडकली आणि संपूर्ण बस जळाली.

मागील काही दिवसांपासून पुणे महामार्गावर बसला आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बस ट्रॅव्ह आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली.
ही घटना एवढी भीषण होती की यात बसने पेट घेतला होता यामध्ये प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.
आज पुण्यात घडलेल्या घटनेमुळे बसच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

Web Title :- Pune Bus Fire | bus carrying devotees from bhiwandi caught fire at ghodegaon bhimashankar road

 

हे देखील वाचा :

Satara Crime | कास पठारचा मोह अनावर, घरी यायला उशीर झाला म्हणून मुलीने केलं हे भयंकर कृत्य; पोलीसही चक्रावले

Rutuja Latake | ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यास उद्धव ठाकरे अडचणीत; तयार ठेवलाय प्लॅन ‘बी’

CM Eknath Shinde | सत्तासंघर्षावर मुख्यमंत्र्यांना नाना पाटेकरांचा थेट प्रश्न…रागावू नका पण अडीच वर्ष का लागली? शिंदे म्हणाले…

 

Related Posts