IMPIMP

Rutuja Latake | ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यास उद्धव ठाकरे अडचणीत; तयार ठेवलाय प्लॅन ‘बी’

by nagesh
Maharashtra Political News | bjp leader devendra fadnavis reaction on cm eknath shinde upset uday samant

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latake) यांचे निधन झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणुक (Andheri East by-Election) घेण्यात येणार आहेत. त्यासाठी शिवसेनेकडून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परंतु आता ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांचा महापालिकेतील नोकरीचा राजीनामा (Resignation) मंजूर न करण्यासाठी महापालिका आयुक्तांवर (Municipal Commissioner) दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यामुळे आगामी काळात जर का ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही, तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ऋतुजा लटके यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली होती, अशा बातम्या समोर आल्या होत्या. शिवसेनेने हा दावा फेटाळला आहे. ऋतुजा लटके यांना शिंदे गटात खेचण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आणि आगामी काळात जर का त्या शिंदे यांच्या गटात गेल्या किंवा त्यांच्या राजीनाम्याची कार्यवाही रखडली, तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दुसऱ्या मार्गाचा देखील विचार करुन ठेवल्याची माहिती आहे.

 

त्यांच्या राजीनाम्याला राजकीय दबावाने थांबविले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे शिवसेनेच्या अ‌ॅड. अनिल परब (Anil Parab) आणि खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केला आहे.
परंतु काही कारणाने लटके यांना उमेदवारी देता आली नाही किंवा त्यांनी शिंदे गटात मोर्चा वळविला,
तर त्यांच्या जागी दुसरा कोणता उमेदवार देता येईल? याची चाचपणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने सुरु केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rutuja Latake | kishori pednekar targets shinde fadnavis government over rutuja latke andheri east bypoll

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | सत्तासंघर्षावर मुख्यमंत्र्यांना नाना पाटेकरांचा थेट प्रश्न…रागावू नका पण अडीच वर्ष का लागली? शिंदे म्हणाले…

Swatantra Veer Savarkar | ‘सावरकर हे भाजपच्या दृष्टीने तोंडी लावायला आणि चघळायचा विषय झाला आहे’

Devendra Fadnavis | नाना पाटेकरांनी विचारला प्रश्न, समान नागरी कायदा येईल का? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट उत्तर

Jayant Patil | भाजपावर जयंत पाटलांचा घणाघात, म्हणाले – भाजप सत्तेविना राहू शकत नाही, पडेल ती किंमत देऊन शिवसेना फोडली

 

Related Posts