IMPIMP

Satara Crime | कास पठारचा मोह अनावर, घरी यायला उशीर झाला म्हणून मुलीने केलं हे भयंकर कृत्य; पोलीसही चक्रावले

by nagesh
Satara Crime | college student girl made fake story of own kidnapping as she went to see kas plateau got late to come home

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन  – Satara Crime | साताऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आपल्या मुलीचे अपहरण (Kidnapping) झाल्याची तक्रार घेऊन एक कुटुंब सातारा शहर पोलीस (Satara City Police) ठाण्यात पोहोचले. यानंतर पोलिसांनी या कुटूंबाच्या तक्रारीवरून तपास सुरु केला. यानंतर तपासात जे काही समोर आले तर ऐकून पोलिसदेखील हैराण (Satara Crime)झाले तसेच मुलीच्या कुटुंबियांनादेखील मोठा धक्का बसला. सातारा शहर पोलिसांनी चार तासांच्या प्रयत्नांनंतर या प्रकरणाचा उलघडा केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

 

कास पठार (Kaas Plateau) पहाणाऱ्यांचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही. सध्या या कास पठारला बहर आला असून अनेक जण या पठारावर जातात. अशाच एका कॉलेजच्या तरुणीला कास पठारचा मोह आवरला नाही. आणि तिने महाविद्यालयातून थेट कास पठार गाठलं. ही तरुणी फुलांच्या एवढं मोहात पडली की आपल्याला उशीर झाला आहे, घरी आपली काळजी करत असतील याचं भानही तिला राहिलं नाही. यानंतर ती जेव्हा घरी आली तेव्हा खूपच उशीर झाला होता. घरात काय कारण सांगायचं म्हणून तिने आपल्या अपहरणाचा (Kidnapping) खोटा बनाव (Satara Crime) रचला.

 

 

कशाप्रकारे रचला बनाव ?

 

“कॉलेजमधून सुटल्यावर मी घरी येत असताना एक ओमनी कार आली आणि त्या कारमधून मला पकडून नेहले.
मी त्यांच्या तावडीतून सुटले आणि घरी आले,” असे तिने आपल्या कुटुंबियांना सांगितले.
हे ऐकून तिच्या कुटुंबातील लोक प्रचंड घाबरले. यानंतर कुटुंबीयांनी तिला घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठले.
पोलिसांची पथके साताऱ्यात फिरू लागली. गाडी सापडत नव्हती.
ज्या परिसरातून तिला नेले त्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फूटेज तपासत असताना ती गाडी तिने सांगितलेल्या वेळेनुसार तिथून गेलीच नसल्याचे समोर आले.
एवढेच नाहीतर ती मुलगीसुद्धा त्या वेळेत तिकडून गेली नव्हती.
यानंतर पोलिसांनी तिची उलट तपासणी सुरु केली तेव्हा हि घटना उघडकीस आली.
यानंतर पोलिसांनी त्या मुलीला समज देऊन घरी सोडले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Satara Crime | college student girl made fake story of own kidnapping as she went to see kas plateau got late to come home

 

हे देखील वाचा :

Rutuja Latake | ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यास उद्धव ठाकरे अडचणीत; तयार ठेवलाय प्लॅन ‘बी’

CM Eknath Shinde | सत्तासंघर्षावर मुख्यमंत्र्यांना नाना पाटेकरांचा थेट प्रश्न…रागावू नका पण अडीच वर्ष का लागली? शिंदे म्हणाले…

Swatantra Veer Savarkar | ‘सावरकर हे भाजपच्या दृष्टीने तोंडी लावायला आणि चघळायचा विषय झाला आहे’

 

Related Posts