IMPIMP

Pune Chandani Chowk | 10 एप्रिलपासून चांदणी चौकातील वाहतूक बंद राहणार, जाणून घ्या पर्यायी मार्ग

by nagesh
Pune Chandani Chowk | chandni chowk in pune will be closed for traffic from april 10 know alternative routes pune traffic police

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Chandani Chowk | पुणे-बंगळूर महामार्गावरील (Pune-Bangalore Highway) चांदणी चौकातील पूल पाडून नवीन पूल बांधण्याचे काम सुरु आहे. नवीन पुलामुळे चांदणी चौकातून वाहतूक सुरळीत होणार आहे. मात्र हा पुल कधी सुरु होणार याची प्रतिक्षा नागरिकांना होती. मात्र आता त्यांची ही प्रतिक्षा संपली असून येत्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Day) दिवशी या पुलाचे (Pune Chandani Chowk) लोकार्पण केले जाणार आहे. या पुलाचे सध्या 90 टक्के काम पूर्ण झाले असून येथे 15 ते 20 एप्रिल दरम्यान गर्डर टाकले जाणार आहे. यापार्श्वभूमीवर चांदणी चौकातून होणारी वाहतूक (Pune Traffic Update) पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे.

 

चांदणी चौकातील (Pune Chandani Chowk) हे काम दोन दिवस चालणार असून त्यामुळे या मार्गावरुन होणारी वाहतूक पर्य़ायी मार्गाने वळवण्यात आली आहे. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. चांदणी चौकातील सर्व्हिस रोडचे काम पूर्ण झाले असून या कालावसाठी हा पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चांदणी चौकातील उड्डाणपूल (Chandani Chowk Flyover) आणि रस्त्यांची 90 टक्के कामं पूर्ण झाली आहेत.
नव्या उड्डाणपुलासाठी आवश्यक खांब उभारणीचे काम पूर्ण झालं आहे. 15 ते 20 एप्रिलदरम्यान गर्डर टाकण्याचे काम होणार आहे.
त्यासाठी वाहतूक दोन दिवसांसाठी पर्यायी मार्गाने वळवण्याचे नियोजन NHAI कडून करण्यात येत आहे.
बावधन ते सातारा आणि वेदभवन ते मुळशी या सेवा रस्त्यांची कामे पूर्ण झाली
असून 10 एप्रिलपासून हे रस्ते वाहतुकीसाठी खुले केले जाणार आहेत.

 

Web Title :- Pune Chandani Chowk | chandni chowk in pune will be closed for traffic from april 10 know alternative routes pune traffic police

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | हडपसर पोलिसांकडून वाहन चोरीचे 14 गुन्हे उघडकीस, 10 लाखाचा मुद्देमाल जप्त

Roshani Shinde Case | ‘रोशनी शिंदे मारहाण फक्त स्टंटबाजी’, शिंदे गटाच्या महिला खासदाराने घेतली अमित शाह यांची भेट

Pune News | कै. पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ दि. ८ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रम – मोहन जोशी

 

Related Posts