IMPIMP

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 125 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 12 new corona patients in Pune city in last 24 hours find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update ) रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून चढ – उतार पाहायला मिळत आहे. काल (मंगळवार) शहरामध्ये नवीन रुग्णांची संख्या 18 होती. तर आज (बुधवार) यामध्ये थोडी वाढ झाली आहे. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update ) 21 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 125 रुग्ण बरे झाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे शहरात आजपर्यंत 45 लाख 25 हजार 805 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे.
यामध्ये 6 लाख 61 हजार 664 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update ) आढळून आले आहे.
त्यापैकी 6 लाख 51 हजार 975 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.
आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 341 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 03 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive ventilator) वर एकही रुग्ण नसून नाॅन इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Non-Invasive ventilator) वर 01 रुग्ण उपचार घेत आहे. एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 3.51 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | Discharge of 125 patients of Corona in the last 24 hours in Pune city find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

Ashish Shelar | ‘दाऊदच्या बिल्डिंगवर कारवाईची हिंमत होत नाही पण राणेंच्या बंगल्यात दुर्बिन लावून शोधकार्य’

Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाचा भाडेकरुंना मोठा दिलासा, भाडे न भरणे हा गुन्हा नाही

 

Related Posts