IMPIMP

Pune Crime | जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

by nagesh
Pune Crime News | Innkeeper who stole from PMPML bus arrested, valuables seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | मोबाईल फोन (Mobile Phone), एक्साईड बॅटरी (Exide Battery), इलेक्ट्रिक मोटार (Electric Motor) चोरणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या (Pune Crime Police Crime) पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime) शितल पेट्रोल पंपाजवळ (Shital Petrol Pump Kondhwa) असलेल्या मोकळ्या जागेत केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सोहेल नासिर शेख Sohail Nasir Sheikh (वय – 20 रा. तोहीद हाईट्स, कोंढवा), फैजान अहमद शेख Faizan Ahmed Sheikh (वय – 21 रा. मलिकनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी कोंढवा पोलीस स्टेशनच्या (Kondhwa Police Station) हद्दीत जबरी चोरीचे गुन्हे केले आहेत. (Pune Crime)

 

गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस अधिकारी, कर्मचारी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग (Patrolling) करत असताना माहिती मिळाली की, कोंढवा भागात राहणाऱ्या सोहेल आणि फैजान या दोघांनी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल, एक्साईड बॅटरी, इलेक्ट्रिक मोटार चोरल्या असून ते बॅटरी व इलेक्ट्रिक मोटार विक्रीसाठी शितल पंपाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत दुचाकीवर (एमएच 12 एफएम 6744) थांबले आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाईल, इलेक्ट्रिक मोटार, एक्साईड बॅटरी आणि दुचाकी असा एकूण 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता एक्साईड बॅटरी रिलायन्स स्टोअर (Reliance Store) येथून तर इलेक्ट्रिक मोटार टिळेकरनगर (Tillekarnagar) येथे चालु असलेल्या बांधकाम साईटवरुन (Construction Site) चोरल्याची कबुली दिली. तर मोबाईल एन. आय. बी. एम रोड (NIBM Road) येथून पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातून जबरदस्तीने चोरल्याचे सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil),
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे (PSI Somnath Shendge), पोलीस अंमलदार आश्रुबा मोराळे, रमेश साबळे, महेश वाघमारे, दयाराम शेगर, चेतन चव्हाण, पृथ्वीराज पांडुळे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests two accused for robbery

 

हे देखील वाचा :

Ashish Shelar | ‘दाऊदच्या बिल्डिंगवर कारवाईची हिंमत होत नाही पण राणेंच्या बंगल्यात दुर्बिन लावून शोधकार्य’

Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाचा भाडेकरुंना मोठा दिलासा, भाडे न भरणे हा गुन्हा नाही

IPL 2022 | …म्हणून MNS ने फोडल्या आयपीएलच्या बसेस; जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts