IMPIMP

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या आत, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 116 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) रुग्ण संख्या कमी होत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आढळून येत आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या दोन हजाराच्या आत आल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 199 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 333 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुणे शहरातील विविध केंद्रावर आज 3 हजार 140 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे.
यामध्ये 199 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या 6 लाख 59 हजार 465 इतकी झाली आहे.
यापैकी 6 लाख 48 हजार 180 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 01 तर हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 338 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 01 हजार 947 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 108 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 16 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 11 रुग्ण आहेत. एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 19.61 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | Great relief to the people of Pune Number of corona active patients within two thousand know other statistics

 

हे देखील वाचा :

Parambir Singh | ‘कोणीही दुधानं धुतलेलं नाही’, सुप्रीम कोर्टाचा परमबीर सिंहांना मोठा दिलासा; जाणून घ्या नेमकं काय म्हणालं SC

Disha Salian | दिशा सालियनच्या आईनं केली हात जोडून विनंती; म्हणाल्या – ‘राजकारणामुळं जगणं मुश्किल झालंय, आम्हाला जगू द्या’

7th Pay Commission | होळीसाठी सरकारी कर्मचार्‍यांना भेट! सरकार देतंय 10,000 रुपये अ‍ॅडव्हान्स; जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा

LPG Price Hike | एलपीजी ग्राहकांसाठी मोठा झटका ! एप्रिल 2022 पासून दुप्पट होऊ शकते स्वयंपाकाच्या गॅसची किंमत

 

Related Posts