IMPIMP

LPG Price Hike | एलपीजी ग्राहकांसाठी मोठा झटका ! एप्रिल 2022 पासून दुप्पट होऊ शकते स्वयंपाकाच्या गॅसची किंमत

by nagesh
LPG Price Hike | lpg price hike news lpg may become costlier from april 2022 the price of lpg will be doubled lpg latest news

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाLPG Price Hike | वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका बसू शकतो. पेट्रोल आणि
डिझेलपाठोपाठ आता LPG मुळेही ग्राहकांच्या खिशावर भार येणार आहे. एप्रिलपासून स्वयंपाक आणखी महाग होऊ शकतो. जगभरात गॅसची मोठी
टंचाई (Global Gas Crunch) निर्माण झाली असून एप्रिलपासून त्याचा परिणाम भारतातही दिसू शकतो, त्यामुळे येथेही गॅसच्या किमती (Domestic
Gas Prices) दुपटीने वाढू शकतात. (LPG Price Hike )

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जागतिक गॅस टंचाई
जागतिक स्तरावर गॅस टंचाईमुळे सीएनजी (CNG), पीएनजी (PNG) आणि विजेच्या किमती वाढणार आहेत. त्यासोबतच वाहने चालवण्याबरोबरच कारखान्यांमधील उत्पादन खर्चही वाढू शकतो. सरकारच्या खत अनुदान बिलातही (Fertilizer Subsidy Bill) वाढ होऊ शकते. एकूणच या सगळ्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाच बसणार आहे.

 

मागणीनुसार पुरवठा नाही
रशिया हा युरोपला गॅस पुरवठ्याचा प्रमुख स्त्रोत आहे, म्हणजेच युक्रेनच्या संकटामुळे त्याचा परिणाम होऊ शकतो. जागतिक अर्थव्यवस्था कोरोनाच्या प्रादुर्भावातून नक्कीच बाहेर येत आहे. परंतु जगभरातील ऊर्जेच्या वाढत्या मागणीमुळे तिचा पुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळेच गॅसच्या दरात मोठी वाढ झाली आहे. (LPG Price Hike)

 

स्थानिक किंमतींच्या बदलानंतर परिणाम
युक्रेनच्या संकटामुळे युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे, त्याचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. आणि आता गॅस देखील प्रभावित होऊ शकतो. जेव्हा सरकार नैसर्गिक वायूच्या देशांतर्गत किमतीत बदल करेल, तेव्हा जागतिक गॅस टंचाईचा परिणाम एप्रिलपासून दिसून येईल. तज्ञांच्या मते, तो 2.9 प्रति डॉलरवरून 6 ते 7 पर्यंत वाढवला जाऊ शकतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मते, खोल समुद्रातून निघणार्‍या वायूची किंमत 6.13 वरून 10 पर्यंत वाढेल.
कंपनी पुढील महिन्यात काही गॅसचा लिलाव करणार आहे.
यासाठी, त्यांनी फ्लोअर प्राईसला क्रुड ऑईलसोबत जोडले आहे, जी सध्या 14 प्रति एमएमबीटीयू आहे.

 

Web Title :- LPG Price Hike | lpg price hike news lpg may become costlier from april 2022 the price of lpg will be doubled lpg latest news

 

हे देखील वाचा :

Police Inspector To DySP/ACP Promotions And Transfer | राज्यातील 14 पोलीस निरीक्षकांची पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नतीने बदली

Former MLA Mohan Joshi | ‘माजी मंत्री जावडेकर, खासदार बापट, महापौर मोहोळ यांना अकार्यक्षम लोकप्रतिनिधी पुरस्कार द्यावा’; नदी सुधार योजना ही स्टंटबाजी – माजी आमदार मोहन जोशी

Ajit Pawar | ‘वीज बिले भरावीच लागतील, ब्रह्मदेव आला तरी वीजबिल माफी नाही’, अजित पवारांनी केलं स्पष्ट

 

Related Posts