IMPIMP

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! शहरातील ‘कोरोना’बाधितांची संख्या हजाराच्या आत, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 12 new corona patients in Pune city in last 24 hours find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनमागील काही दिवसांपासून पुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीमध्ये कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या दोन हजारांहून अधिक होती. मात्र आज पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची (Pune Corona Update) संख्या हजाराच्या आत आली आहे. गेल्या 24 तासात 776 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 2056 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शहरात आजपर्यंत 43 लाख 98 हजार 280 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 6 लाख 52 हजार 292 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 29 हजार 922 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 08 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 06 तर हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 304 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 13 हजार 066 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 228 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 49 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 26 रुग्ण आहेत. एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 6.35 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Corona Update | Great relief to the people of Pune! The number of corona victims in the city is within a thousand, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Petrol-Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता; आशियातील तेल ग्राहकांसाठी क्रूड ऑईलच्या दरात मोठी वाढ

Nitesh Rane | नितेश राणेंच्या छातीत असह्य वेदना, वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर येथील CPR मध्ये दाखल

Solapur Crime | बँकेच्या कस्टमर केअरनेच ग्राहकाला घातला सव्वा दोन लाखाचा गंडा

 

Related Posts