IMPIMP

Pune Crime | दुबईहून तस्करी करुन आणलेली १ किलो १६६ ग्रॅमची सोन्याची बिस्किटे पुण्याच्या लोहगाव विमानतळावर जप्त

by nagesh
Pune Crime | 1 kg 166 grams gold biscuits smuggled from Dubai seized at pune lohegaon international airport

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | दुबईहून (Dubai) स्पाईस जेटच्या विमानातून तस्करी (Smuggling) करुन आणलेली १ किलो १६६
ग्रॅम वजनाची १० सोन्याची बिस्किटे (Gold Biscuits Smuggling) कस्टम विभागाने (Customs Department) पुण्याच्या लोहगाव विमानतळावर
(Pune Lohegaon International Airport)
जप्त केली. (Pune Crime)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दुबईहून पुणे (Dubai-Pune) आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pune International Airport) शुक्रवारी पहाटे स्पाईस जेटचे विमान आले. हे विमान पुढे देशांतर्गत वाहतूकीसाठी रवाना होते. या विमानाची सीमा शुल्क विभागाकडून तपासणी करण्यात येत होती. यावेळी प्रवाशांच्या सिटखाली एका काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या एका पिशवीत १० सोन्याची बिस्किटे आढळून आली. ६१ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या या बिस्किटांचे वजन १ किलो १६६ ग्रॅम इतके आहे. हे सोने तस्करी करुन कोणी आणले होते, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. (Pune Crime)

 

गेल्या महिन्यात आणखी दोन सोने तस्करीची (Gold Smuggling) प्रकरणे आढळून आली.
एका प्रवाशाने आपल्या बुटामध्ये ३० लाख ४५ हजार रुपयांचे ६५० ग्रॅम वजनाचे सोने पेस्ट स्वरुपात लपवून आणले होते.
त्याला सीमा शुल्क विभागाने अटक केली. दुसर्‍या एका प्रकरणात प्रवाशाने ३२ लाख रुपयांचे विदेशी चलन पुण्यातून घेऊन जात असताना पकडण्यात आले होते.

 

Web Title :- Pune Crime | 1 kg 166 grams gold biscuits smuggled from Dubai seized at pune lohegaon international airport

 

हे देखील वाचा :

Pune-Solapur Road Accident | दुर्दैवी ! पुणे-सोलापूर रस्त्यावर ट्रकची दुचाकीस्वार मयलेकींना धडक, महिलेचा मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी

MP Navneet Rana | गृहमंत्री फडणवीस खा. नवनीत राणांवर कारवाईचे आदेश देणार का? NCP चा सवाल

Queen Elizabeth II | आपल्या पाठीमागे किती संपत्ती सोडून गेल्या ब्रिटीश क्विन एलिजाबेथ-2, वारसाहक्काने कुणाला मिळणार सर्व मालमत्ता?

 

Related Posts