IMPIMP

Pune Crime | मुंढव्यातील हॉटेल मेट्रोमध्ये डांगडिंग करणार्‍या अन् दारूच्या नशेत झिंगलेल्या पुणे शहर पोलिस दलातील 3 कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल

फरासखाना, चंदनगर पो.स्टे. आणि समर्थ वाहतूक विभागातील कर्मचार्‍याचा समावेश

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | मुंढव्यातील हॉटेल मेट्रोमध्ये (Hotel Metro Mundhwa) डांगडिंग करणार्‍या आणि दारूच्या नशेत झिंगलेल्या पुणे शहर पोलिस दलातील 3 पोलिस कर्मचार्‍यांवर (Pune City Police) मुंढवा पोलिस ठाण्यात (Mundhwa Police Station) भा.द.वि कलम 323, 504, 506 सह मुंबई दारूबंदी अधिनियम कलम – 85(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उमेश मरीस्वामी मठपती Umesh Mariswami Mathpati (29, पोलिस अमंलदार ब.नं. 2581, नेमणुक – फरासखाना पोलिस स्टशेन. रा. सदानंद नगर, सोमवार पेठ), अमित सुरेश जाधव Amit Suresh Jadhav (37, पोलिस अंमलदार ब.नं. 6939, नेमणुक – समर्थ वाहतुक विभाग, पुणे शहर. रा. भवानी पेठ, पोलिस लाईन, पुणे) आणि योगेश भगवान गायकवाड Yogesh Bhagwan Gaikwad (32, पोलिस अंमलदार ब.नं. 9836, नेमणुक – चंदननगर पोलिस स्टेशन. रा. मातोश्री बिल्डींग, गणपती मंदिर समोर, लोणकर वस्ती, केशवनगर, मुंढवा, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात कुनाल दशरथ मद्रे (27, धंदा – मेट्रो लॉऊज हॉटेल मॅनेजर, रा. आगवाली चाळ, लेन नं. 3, गणपती मंदिर बाजुला, घोरपडीगाव) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 21 नोव्हेंबर रोजी रात्री 1.15 वाजता फिर्यादी मद्रे हे ए.बी.सी. रोड, कपिता मॅट्रीक्स बिल्डींग येथील हॉटेल मेट्रो हे हॉटेल बंद करून आवरा आवरीचे काम करीत होते.
त्यावेळी पोलिस अंमलदार उमेश मठपती, अमित जाधव आणि योगेश गायकवाड हे हॉटेलमध्ये आले.
त्यांनी बार काऊन्टरवर दारू पिऊन आणखी दारू मागणी केली.
तसेच त्यांनी रोहित काटकर याला हाताने मारहाण करून मोठ मोठयाने शिवीगाळ केली.
धमकी देऊन हॉटेलमधील बार काऊंटरवर दारू पिऊन धिंगना केला.
घटनेची माहिती समजल्यानंतर मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे
(Senior Police Station Ajit Lakde), पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदिप काकडे (
Police Inspector Pradeep Kakde) आणि उपनिरीक्षक शिवाजी काटे यांनी घटनास्थळी भेट दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुण्यातील 3 पोलिस कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक आश्विनी भोसले करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A case has been registered against 3 police of Pune city who were drunk in Hotel Metro in Mundhwa

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणारे सीमाप्रश्नाला काय न्याय देणार?

Nora Fatehi | नोरा फतेहीबरोबर सहकलाकाराने केलं गैरवर्तन अन् दोघांमध्येही सेटवरच झाले भांडण; अभिनेत्रीनं सांगितलेला ‘तो’ किस्सा चर्चेत

Sanjay Raut Tweet | ‘मग त्यांनी बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली का वाहिली नाही?’ चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना सवाल

 

Related Posts