IMPIMP

Pune Crime Branch Police | पुण्याच्या गुन्हे शाखेकडून तलवार, रेम्बो चाकूने केक कापणारे 2 ‘बर्थ डे’ बॉय गजाआड

by nagesh
Pune Crime | Shivajinagar police arrest a notorious criminal who stole a rickshaw in Pune city

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune Crime Branch Police | तलवार आणि रेम्बो चाकुने केक कापून त्याचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर टाकणाऱ्या दोन बर्थ डे बॉयला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Crime Branch Police) बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखा युनिट-1 (Pune Crime Branch Police) च्या पोलिसांनी दोघांना अटक (Arrest) करुन तलवार (Sword) आणि रेम्बो चाकु जप्त केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी (दि. 27) केली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

दत्तात्रय लक्ष्मण धनकवडे (वय-42 रा. सर्वे नं. 36/2, दत्तप्रसाद अपार्टमेंट, सावकर चौक, धनकवडी) याच्यावर सहकारनगर पोलिस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. तर टिपु उर्फ सलमान इम्तियाज शेख (वय- 30 रा. 416, न्यु मंगळवार पेठ) याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth police station) गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

 

 

गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार (Amol Pawar) यांना माहिती मिळाली की, 9 एप्रिल 2021 रोजी दत्तात्रय धनकवडे याने स्वत:चा वाढदिवसाचा केक तलवारीने कापून त्याचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) टाकले होते. तो सध्या तिच तलवार घेऊन घराच्या खालील पार्किगमध्ये उभा आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून धनकवडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 1 हजार रुपये किमतीची तलवार जप्त केली आहे.

 

गुन्हे शाखेने केलेल्या दुसऱ्या कारवाईत टिपु शेख याने 25 जुलै रोजी रेम्बो चाकुने केक कापून त्याचे फोटो
व्हॉट्सअॅपवर टाकल्याची माहिती पोलीस अंमलदार इम्रान शेख (Imran Sheikh) यांना समजली. तसेच
आरोपी रेम्बो चाकू घेऊन साई हेरीजेट हॉटेलजवळ सार्वजनिक रस्त्यावर उभा असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक हजार रुपये किमतीचा रेम्बो चाकु जप्त केला आहे.

 

 

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अशोक मोराळे (Additional Commissioner of Police Ashok Morale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (Deputy Commissioner of Police Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुरेंद्र देशमुख (Assistant Commissioner of Police Surendra Deshmukh)
यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी (Police Sub Inspector Sanil Kulkarni),
पोलीस अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख, अजय थोरात, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime Branch Police | 2 ‘Birthday’ boys from Pune crime branch cut cakes with sword and Rambo knife

 

हे देखील वाचा Pune News | पन्नास टक्के शालेय फी कपातीची लोकजनशक्ती पार्टीची मागणी

Money Laundering Case | मनी लॉड्रिंग प्रकरणात शिवसेनेच्या आमदाराला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

Kirloskar Brothers | किर्लोस्कर बंधूंच्या कंपन्यांमध्ये 130 वर्षांच्या वारशावरून वाद; जाणून घ्या प्रकरण

Related Posts