IMPIMP

Pune Crime | अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक, 3.63 लाखांचा मुद्देमाल जप्त

by nagesh
une Crime News | The four who kidnapped and abducted the contractor were chased and imprisoned

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या (Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell) वानवडी भागात पकडले. त्याच्याकडून दीड लाख रुपयांचे 10 ग्रॅम मेफेड्रोन Mephedrone (एमडी), मोबाइल संच, दुचाकी असा तीन लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) करण्यात आला. ही कारवाई लुल्लानगर परिसरात करण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मतीन हुसेन मेमन (वय 21, रा. सबेरा पार्क, कोंढवा), शाहरुख कादीर खान (वय 29, रा. युनिटी पार्क, कोंढवा), अनमोलसिंग मनचंदा सिंग (वय 33, रा. साईद्वारका सोसायटी, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्या वेळी लुल्लानगर परिसरात दोन तस्कर अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मेमन, खान यांना पकडले. चौकशीत साथीदार सिंग याचे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मेफेड्रोन, दुचाकी, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी मेमन, खान, सिंग शहरात अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.

 

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक आयुक्त गजानन टोम्पे
(ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड
(Police Inspector Vinayak Gaikwad), सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर
(API Shailaja Jankar), लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengle), मनोज साळुंके, योगेश मोहिते,
विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदीप शिर्के यांनी कारवाई केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Crime Branch arrests three drug dealers, seizes 3.63 lakh worth of goods

 

हे देखील वाचा :

Vinayak Raut | खोके घेतले नाहीत म्हणून चौकशी, विनायक राऊतांचा गंभीर आरोप

Chandrashekhar Bawankule | पंजा आणि घड्याळाच्या हातात असलेली मशाल आम्ही विझवणार – चंद्रशेखर बावनकुळे

Pune Crime | पूर्वमैनस्यातून मंगळवार पेठेत तरुणावर कोयत्याने सपासप वार

 

Related Posts