IMPIMP

Vinayak Raut | खोके घेतले नाहीत म्हणून चौकशी, विनायक राऊतांचा गंभीर आरोप

by nagesh
MP Vinayak Raut | shivsena MP Vinayak Raut on cm eknath shinde group mp prataprao jadhav

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन कोकणातील कुडाळ तालुक्याचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) आणि राजापूर तालुक्याचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्याविरोधात सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB)  चौकशी सुरु आहे. या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भाष्य केले आहे. नाईक आणि साळवी हे मातोश्रीचे प्रामाणिक शिलेदार आहेत. ते भाजपच्या (BJP) खोक्याला बळी पडले नाहीत. त्यांनी निष्ठा, श्रद्धा जपली. खाल्ल्या मीठाला ते जागले आहेत. त्यांनी खोके घेतले नाही. खोक्याला बळी पडले नाहीत. म्हणून त्यांच्या मागे कोणत्या ना कोणत्या संस्थेचा, विभागाचा दबाव टाकायचा, 2002 पासूनचे व्यवहार तपासायचे, कटकारस्थान करायचे काम सुरु आहे, असे सिंधुदुर्गचे  खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले. ते रत्नागिरीत पत्रकारांसोबत बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला विनायक राऊत (Vinayak Raut) सकाळी रत्नागिरीला आले होते. त्यावेळी त्यांनी नाईक आणि साळवी यांच्या मागे असलेल्या चौकशीवर भाष्य केले. तुम्ही कितीही एसीबी लावा, एलसीबी (LCB) लावा, सीबीआय (CBI) लावा, ईडी (ED) लावा, वैभव नाईक आणि राजन साळवी शिवसेना सोडणार नाहीत.

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना भाजपने दक्षिण मुंबईची जबाबदारी दिली आहे.
त्यावर खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केले. ज्यांनी जबाबदारी दिली त्यांचे मी आभार मानतो.
नारायण राणे  (Narayan Rane) आणि पनवती हे समीकरण यापूर्वी मुंबई आणि सिंधुदुर्गात दिसून आले आहे.
पुन्हा ते दिसेल. बरोबर दोघांनाही घ्या. एकट्याला नको. त्यांच्या दोन मुलांना देखील घेऊन जा,
असे राऊतांनी त्यांना सांगितले.

 

 

Web Title :- Vinayak Raut | investigation as vaibhav naik rajan salvi did not fall for the bait mp vinayak raut allegation

 

हे देखील वाचा :

Chandrashekhar Bawankule | पंजा आणि घड्याळाच्या हातात असलेली मशाल आम्ही विझवणार – चंद्रशेखर बावनकुळे

Pune Crime | पूर्वमैनस्यातून मंगळवार पेठेत तरुणावर कोयत्याने सपासप वार

Aditya Thackeray | अंधेरी पूर्व पोटनिवडणूक माणुसकी विरुद्ध खोकासूर, आदित्य ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचे जोरदार प्रत्युत्तर

 

Related Posts