IMPIMP

Pune Crime | डेक्कन परिसरातील नदीपात्रात झालेल्या खूनाचा पर्दाफाश, धक्कादायक माहिती आली समोर

by nagesh
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | भिडे पुलाजवळ (Bhide Bridge) नदीपात्रालगत झालेल्या खूनाचा (Murder Case) छडा लावण्यात डेक्कन पोलिसांना (Deccan Police) यश आले असून पोलिसांनी तिघांना अटक (Arrest) केली. मामाच्या मुलानेच पूर्व वैमनस्यातून हा खून (Murder In Pune) केल्याचे निष्पन्न झाले आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नरेश गणेश दळवी Naresh Ganesh Dalvi (वय ३०), अजय शंकर ठाकर Ajay Shankar Thacker (वय २५) समीर कैलास कारके Sameer Kailas Karke (वय २६, सर्व रा. उर्से, ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या घटनेत गणेश सुरेश कदम Ganesh Suresh Kadam (वय ३५, रा. शनिवार पेठ) या लाँड्रीचालकाचा खून (Pune Murder News) झाला होता. नरेश हा गणेश कदम यांच्या मामाचा मुलगा आहे.

 

कदम यांचा लाँड्रीचा (Laundry) व्यवसाय होता. सोमवारी दुपारी कदम यांचा मृतदेह डेक्कन परिसरातील नदीपात्राजवळ आढळून आला होता. त्यांच्या चेहर्‍यावरील जखमा व इतर माहितीवरुन पोलिसांनी खूनचा गुन्हा दाखल केला होता. (Pune Crime)

 

डेक्कन पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात आरोपी हे उर्से येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी उर्से येथे जाऊन तिघांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी खूनाची कबुली दिली.

 

नरेश आणि कदम यांच्यात पूर्वीपासून वाद होते. त्यातूनच नरेश याने कदम याला डेक्कन नदीपात्राजवळ बोलावले.
त्या ठिकाणी तिघांनी मिळून त्यांना दारु पाजली. त्यानंतर त्यांना मारहाण (Beating) करुन त्यांचा खून केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे (Senior Police Inspector Muralidhar Karpe)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे
(Assistant Police Inspector Kalyani Padole), पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे
(Sub-Inspector of Police Ganesh More), दत्तात्रय सावंत, सहायक फौजदार निलेश पाटील,
हवालदार धनश्री सुपेकर, शेखर कौटकर, राम गरूड, रोहीत मिरजे, गणेश तरंगे यांच्यासह पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | It was the uncle’s son who committed the murder out of malice; Three people were arrested in the case of murder in river bed

 

हे देखील वाचा :

Home Remedy For Hair Fall | केस गळती थांबेल ताबडतोब, उगवतील नवीन केस, केवळ ‘या’ 3 तेलाने करा मालिश

Pune Crime | अनैसर्गिक संबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वकिलाने तरुणाला लुबाडले; भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात FIR

Pune Crime | उत्तमनगर परिसरात नवविवाहितेची टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या

 

Related Posts