IMPIMP

Pune Crime | कर्जासाठी प्रोसेसिंग फी घेऊन अनेकांची फसवणूक ! पतपेढी बंद करुन चेअरमनसह सर्व जण झाले फरार; पुण्याच्या कोंढव्यातील घटना

by nagesh
Pune Crime | 48 lakhs fraud of the company by cross-selling water purifier material; Type at Wagholi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | वाहन कर्जासह वेगवेगळ्या कामासाठी कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी प्रोसेसिंग फी व डिपॉझिटच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेऊन पतपेढी बंद करुन चेअरमनसह कर्मचारी फरार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला (Pune Crime) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) टी. एस. मल्टीस्टेट को – ऑप क्रेडीट सोसायटीचे चेअरमन व कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

चेअरमन नशीब शेख (वय ४५), कर्मचारी मोहसीन झुल्फीकार पठाण (वय ३०) आणि राजे राठोड (वय ३२, सर्व रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ओमकार सुरेश लोखंडे (वय २५, रा. महमंदवाडी रोड) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa News) फिर्याद दिली आहे. हा प्रकार १२ मार्च ते ३१ मार्च दरम्यान घडला आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नशीब शेख याने टी एस मल्टीस्टेट को – ऑप क्रेडीट सोसायटी (T.S. Multistate Cooperative Credit Society)
या पतसंस्थेचे कोंढव्यातील कोनॉर्क प्लाझामध्ये कार्यालय सुरु केले होते. फिर्यादी यांचा टुरीस्टचा व्यवसाय आहे.
व्यवसायासाठी त्यांना एक्सेंट टी परमिटची नवी गाडी घेण्यासाठी ७ लाख रुपयांचे कर्ज हवे होते.
चेअरमन नशीब शेख याने कर्ज देण्याचे आमिष दाखवून प्रोसेसिंग फी व डिपॉझिट म्हणून त्यांच्याकडून ७० हजार रुपये घेतले.
त्यानंतर त्यांना १६ मार्च रोजी ७ लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, पतपेढीच्या खात्यामध्ये पैसे नसल्याने तो परत आला.
दरम्यान शेख याने पतपेढी बंद करुन फरार झाला होता. लोखंडे यांच्या प्रमाणेच शेख याने अनेकांना कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनेक खातेधारकांची फसवणूक केली असून कोंढवा पोलिसांकडे खातेधारक तक्र्रार घेऊन येत (Pune Crime) आहे.
आतापर्यंत ५ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. सहायक पोलीस निरीक्षक बर्गे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Many cheat by taking processing fees for loans T.S. Multistate Cooperative Credit Society ! The credit bureau closed and everyone, including the chairman, fled; Incidents in Kondhwa police station of pune

 

हे देखील वाचा :

Nora Fatehi | नोरा फतेही झाली Oops Moment ची शिकार, व्हिडिओ झाला व्हायरल

Jacqueline Fernandez | ‘महाठग’ सुकेश चंद्रशेखरने अमित शहांच्या मोबाईल नंबरला ‘स्पूफ’ करून केली जॅकलिन फर्नांडिससोबत मैत्री, नंतर…

PM KISAN | 15 डिसेंबर ऐवजी ‘या’ तारखेला सुद्धा येऊ शकतो 10वा हप्ता, थेट खात्यात ट्रान्सफर होतील 2000 रुपये

 

Related Posts