IMPIMP

Pune Crime News | दुकानावर कर्ज घेतले असतानाही खोटी माहिती देऊन 84 लाखांची फसवणूक; वकिलासह हवेली उपनिबंधक कार्यालयातील एकावर गुन्हा दाखल

by sachinsitapure
Pune Crime News | 84 lakhs fraud by providing false information even while taking a loan from the shop a case has been registered against one of the haveli sub registrars office along with the lawye

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | बँकेचे मॉर्गेज लोन (Bank Mortgage Loan) असल्याची माहिती लपवून ठेवून दुकान विकत देऊन ८४ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत अफसार अबरार अहमद अन्सारी (वय ३४, रा. सरखेज, अहमदाबाद, गुजरात) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३७५/२३) दिली आहे. त्यानुसार सोनी सोनाराम चौधरी Soni Sonaram Chaudhary (रा. हडपसर), सोनाराम रामुराम चौधरी (Sonaram Ramuram Chaudhary), अ‍ॅड. रमेश खंडाळे (Advt. Ramesh Khandale) आणि हवेली उपनिबंधक कार्यालय (Haveli Sub-Registrar Office) क्रमांक ९ मधील जबाबदार व्यक्ती अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२० पासून आतापर्यंत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी खरेदी खताद्वारे सोनी चौधरी यांच्याकडून हांडेवाडी रोडवरील यशराज सोसायटीमधील (Yash Raj Society Handewadi Road) तळमजल्यावरील दुकान खरेदी केले होते.
या गाळ्याच्या मालकीबाबत त्यांनी खोटी माहिती दिली.
गाळ्यावर इंडसंड बँकेच्या (Indusund Bank Wanwadi Branch) वानवडी शाखेतून मॉर्गेज लोन घेतले होते.
ही माहिती लपवून गाळ्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसल्याची खोटी माहिती दिली.
फिर्यादी यांची ८४ लाख रुपयांची फसवणूक (Fraud Case) केली.

आरोपी चौधरी याच्याबरोबर संगनमत करुन फिर्यादीपासून ही माहिती लपवून ठेवण्यात मदत केल्याबद्दल
वकिल व हवेली क्रमांक ९ मधील जबाबजदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे (Assistant Police Inspector Shendge) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | 84 lakhs fraud by providing false information even while taking a loan from the shop a case has been registered against one of the haveli sub registrars office along with the lawye

हे देखील वाचा

Pune ACB Trap | पुण्यातील पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Political News | निवृत्त आयपीएस (IPS) अधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार

Nitin Desai Suicide | बॉलीवूड हादरले ! कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची एन डी स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या; चित्रपटसृष्टीत खळबळ

Related Posts