IMPIMP

Pune Crime News | ‘बाऊंसी’वर एअरगनमधून गोळीबार; मांजरी परिसरातील घटना

by sachinsitapure
Airgun Firing On Dog In Manjari

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | आरडाओरडा करुन नेहमी त्रास देणार्‍या कुत्र्यास एकाने एअरगनमधून गोळी (Airgun) घालून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. गोळी घालणार्‍यास पोलिसांनी (Pune Police) ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News )

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अली रियाज थावेर (रा. जी एच कॉम्प्लेक्स, झेड कॉर्नर, मांजरी) असे त्याचे नाव आहे. याबाबत 46 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गुरजि नं. १८०८ /२३) दिली आहे. हा प्रकार मांजरीतील किरण इन्केव्ह येथे २१ नोव्हेबर रोजी रात्री ११ वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी येथील किरण इन्केव्ह लोकमंगल सोसायटी समोरील डांबरी रोडवर
फिर्यादी यांची पाळीव कुत्री बाऊंसी ही बसलेली होती. कुत्री आरडाओरडा करुन त्रास देत असल्याने अली थावेर हे
आपल्याकडील स्पोटर्स एअरगन घेऊन तेथे आले. त्यांनी गोळी घालून कुत्रीला जखमी करुन विकलांग केले.
फिर्यादी यांनी तिच्यावर उपचार केल्यानंतर आता फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे (PSI Santosh Gore)
तपास करीत आहेत.

Related Posts