IMPIMP

Manoj Jarange Patil | सरकारकडे जरांगेंची मागणी, जातीवाचक शब्द वापरणाऱ्या छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा

by sachinsitapure
Manoj Jarange Patil

छत्रपती संभाजीनगर : सरकारसत्ता ऑनलाईन – Manoj Jarange Patil | राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी हिंगोली येथील ओबीसी आरक्षण (OBC Reservation) बचाव सभेत बौद्ध समाजाचा महार असा उल्लेख करत जातिवाचक शब्द वापरला. मराठा आणि बौद्ध समाजात तेढ निर्माण करणे असा भुजबळांचा प्रयत्न होता, परंतु या वक्तव्याला आता वेगळे वळण लागले आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी जातीवाचक शब्दावरून भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच भुजबळाचा जुनाट विचारांचा नेता असा उल्लेख केला.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

छगन भुजबळ यांच्या हिंगोलीतील वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेताना मनोज जरांगे म्हणाले, भुजबळांची भाषा भयंकर आहे. जातीवाचक शब्दाबद्दल छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करायला हवा. भीमा-कोरेगावचा उल्लेख करताना तुम्ही तो जातीवाचक शब्द वापरला. सरकारने या जुनाट नेत्याला रोखले पाहिजे. यांच्यामुळे जातीजातीत तेढ निर्माण होत आहे. तुम्ही काहीही केले तरी मराठा-दलित समोरासमोर येणार नाही.

मी ओबीसींबाबत बोलत नाही तर जुनाट नेत्यांबाबत बोलत आहे. सरकारने यांना रोखले नाही तर आम्हीदेखील हिशोब पूर्ण करू. भुजबळांनी हिंगोलीच्या सभेत जातीवाचक शब्द वापरला. महार शब्दाचा उल्लेख केला. का त्यांच्याकडे लक्ष गेले नाही. आमच्या दलित बांधवांना कशासाठी जातीवाचक बोलता, असा सवाल जरांगे यांनी केला

जरांगे (Manoj Jarange Patil) पुढे म्हणाले, मी बोललेल्या विधानाचा आणि जातीचा कुठेच संदर्भ येत नाही. लायकी शब्दात जातीचा शब्द येत नाही. तुम्ही थेट जातीचा शब्द वापरून दलित बांधवांचा अपमान केला. दलित बांधवांची गरज लागली म्हणून आज तुम्ही विधाने करत आहात. हुतात्मा स्मारक गोमुत्राने धुवून काढले होते ते विसरला का? आम्ही एखादा शब्द बोललो तर तुम्ही जातीय रंग द्यायला लागला. दलित बांधव आणि आमची दुश्मनी आहे का?

जरांगे म्हणाले, सामान्य ओबीसी बांधवांसोबत आमची दुश्मनी आहे का? त्यांनाही पश्चाताप होत असेल याला गोरगरिब लेकरांची कामे करतील यासाठी निवडून दिल आहे. आज २९ जाती बाहेर पडल्या. या लोकांमुळे आम्हाला आरक्षण मिळत नाही अशी बातमी आहे. ओबीसीतूनच वेगळा प्रवर्ग करा अशी मागणी होऊ लागली. हा त्या जातींवर अन्याय नाही का?

मनोज जरांगे म्हणाले, कायदा एवढा कळत असेल तर मराठा समाजाच्या शासकीय नोंदी सापडल्या, ही कागदेही आणा. नुसते आयुष्यभर विदुषकपणा अंगात आहे. पहिल्यापासून तेच केले, आताही तेच करत आहात. ज्यांनी मोठे केले त्यांना छाटत छाटत पुढे आले. गावबंदीमुळे शिक्षा होते हा कागद आणला तसा मराठ्यांच्या नोंदी सापडल्याने त्यांना ओबीसीत होता येते हादेखील कागद आणावा, ते जमत नाही का? का डोळे गेलेत तुमचे?

मनोज जरांगे यांनी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, लायकी नसलेल्यांच्या हाताखाली
काम करावे लागत आहे यात चुकीचे काय बोललो? आमचे लोक सुशिक्षित बेकार झालेत, त्यांचे हाल होत आहेत.
फक्त याला जातीय रंग देऊ नका. भुजबळांना बाकी काही काम नाही.

जरांगे पुढे म्हणाले, माझ्या वक्तव्याचा अर्थ समाजाशी नाही. मी जातीवाद करतो असा एकही माणूस दाखवावा.
मी सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी सहकार्य करतो. मराठा आरक्षणाच्याविरोधात बोलले तर सुट्टीच देणार नाही.
जातीवाचक बोलत आहेत म्हणून ४-५ गेले. जुनाट नेते आहात. अनुभवी आहात.
तुमच्या मांडीला मांडी लावून बसायलाही ओबीसी नेते नको म्हणायला लागले आहेत.
जातीजातीत तेढ निर्माण करायला लागेलत. सरकार दबावात येत आहे.

भुजबळांचा समाचार घेताना जरांगे पुढे म्हणाले, आम्ही शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण मागत आहोत.
समाजाने शांतता बाळगावी. वातावरण दुषित होईल असे वागू नका. कायदेशीर, संविधान मार्गाने आम्ही ओबीसी
आरक्षणात जाणार आहोत. सगळ्या नोंदी सापडल्या आहेत. स्वस्वार्थासाठी समाज अडचणीत येईल असे कृत्य करू नका.
२४ डिसेंबरपर्यंत शांत राहा.

जरांगे म्हणाले, ते वातावरण दुषित ते करत आहेत. अंबड, हिंगोलीची सभा बघा, अंबड ते हिंगोली यात ४ ताकदवान नेते
सोडून गेले. भुजबळांच्या सभेला नको जायला असे त्यांना वाटते. त्यामुळे आपण चुकीच्या मार्गाने चाललो आहोत हे
त्यांच्या लक्षात यायला हवे. या राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडायला नको.
या जुनाट नेत्याला थांबवा, हे जातीशिवाय बोलतच नाही.

जरांगे म्हणाले, आम्ही स्वराज्याच्यावेळी केलेले सहकार्य विसरलो नाही.
एखाद्या जातीला आरक्षण मागणे म्हणजे जातीवाद म्हणत नाही. सर्व समाज हुशार झाल्याने कुणीही
आता त्यांना फसणार नाही.

Related Posts