IMPIMP

Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिसांकडून दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी सराईत गुन्हेगाराला अटक

by nagesh
Pune Crime News | Bharti Vidyapeeth police arrested a criminal in the crime of Dacoity Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | दरोडयाच्या गुन्ह्यात (Dacoity Case) गेल्या 6 महिन्यापासुन फरार असलेल्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) अटक केली आहे. त्याच्या साथीदारांना यापुर्वीच अटक करण्यात आली होती. त्यांनी दुकानामध्ये घुसून दुकान मालक व मॅनेजरला शिवीगाळ करून दुकानातील दारूच्या बाटल्या, काचेचे ग्लास, थंड पेयाच्या बाटल्या दगड फेकुन फोडल्यानंतर काऊंटरमधील पैसे जबरदस्तीने चोरून नेले होते. ही घटना दि. 24 मे 2023 रोजी घडली होती. (Pune Crime News )

अजय पांचाळ Ajay Panchal (23, रा. शनिनगर, आंबेगाव बु., पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अटक आरोपी अजय पांचाळ आणि त्यांचे साथीदार तेजस वाडेकर, सोहेल आसंगी, गोविंद लोखंडे, सोन्या कांबळे आणि अमोल ढावरे यांनी दि. 24 मे 2023 रोजी कात्रज परिसरातील एका वाईन शॉपमध्ये घुसून दुकान मालक व मॅनेजरला शिवीगाळ केली होती. मी अजय पांचाळ असुन मी आताच जेल मधुन बाहेर सुटुन आलोय, तुला मी आलोय कळत नाही का, हप्ता चालु करायाचा नाही का अशी धमकी देत आरोपींनी दुकानातील दारूच्या बाटल्या, टीव्ही आणि इतर वस्तुंची तोडफोड करून काऊंटरमधील 10 हजार रूपये जबरदस्तीने चोरून नेले होते. (Pune Crime News)

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सोहेल मोदीन आसंगी (Sohail Modin Asangi), अमोल तानाजी ढावरे (Amol Tanaji Dhavre), आदित्य उर्फ सोन्या खंडु कांबळे (Aditya alias Sonya Khandu Kamble) यांना अटक केली होती. अजय पांचाळ हा फरार होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, पोलिस अंमलदार अभिजीत जाधव आणि विक्रम सावंत यांना पांचाळबद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला सापळा रचुन अटक केली आहे. अजय पांचाळ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Pune Police Record) असून त्याच्याविरूध्द भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल आहे. तो फरार होता, आता त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil),
सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार (Sr PI Vijay Kumbhar), पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक (PI Vijay Puranik),

सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal), सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन धामणे (API Sachin Dhamne),
पोलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता (PSI Dhiraj Gupta), पोलिस अंमलदार अभिजीत जाधव, विक्रम सावंत, शैलैश साठे,
चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, सचिन गाडे, धनाजी धोत्रे,
निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, नितीन जाधव आणि राहुल तांबे यांच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Web Title : Pune Crime News | Bharti Vidyapeeth police arrested a criminal in the crime of Dacoity Case

Related Posts