IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन – कौटुंबिक वैमनस्यातून रिक्षा जाळून टाकण्याचा प्रकार; पाषाणमधील लोंढे वस्तीतील घटना

by nagesh
Pune Crime News | Chaturshringi Police Station – Rickshaw Burned Due to Family Enmity; Londhe settlement incident in Pashan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मोकळ्या मैदानात पार्क केलेल्या रिक्षावर (Auto Rickshaw) पेट्रोल टाकून ती जाळून टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत राहुल सुभाष उभे (वय ३५, रा. समतानगर, लोंढे वस्ती, पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३८४/२३) दिली आहे. हा प्रकार समतानगरमध्ये मंगळवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी भाडेतत्वावर रिक्षा चालविण्यासाठी घेतली आहे. दिवसभर रिक्षा चालवून रात्री ते घरी आले व मोकळ्या जागेत पार्क करुन ते घरात गेले. त्यानंतर रात्री ११ वाजता शेजारी राहणार्‍या मुलाने त्यांना त्यांची रिक्षा पेटली असल्याचे सांगितले. त्यांनी व शेजारी राहणार्‍यांनी पाणी टाकून रिक्षाची आग विझविली. त्यात रिक्षाचे हुड, सीट, बॉडी, मीटर बॉक्स, बॅटरी व वायरिंग जळून गेले.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

फिर्यादी याचा मेव्हण्याबरोबर कौटुंबिक कारणावरुन वाद झाले होते. त्यावरुन त्याने दोन वेळा रिक्षाची तोडफोड केली होती.
मंगळवारी सकाळी ११ वाजता त्याच्याशी पुन्हा वाद झाला होता. तेव्हा त्याने फिर्यादी यांना पाहून घेण्याची धमकी दिली होती.
त्यामुळे आपल्या मेव्हण्यानेच रिक्षा जाळली असा असा संशय उभे यांनी वर्तविला आहे.

Web Title : Pune Crime News | Chaturshringi Police Station – Rickshaw Burned Due to Family Enmity; Londhe settlement incident in Pashan

Related Posts