IMPIMP

Pune Crime News | खराडी व चंदननगर परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 17 जणांवर कारवाई

by nagesh
Pune Police Crime Branch News | Social Security Cell Pune raid on gambling den in Bundagarden area, action taken against 8 persons

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | पुणे शहरातील खराडी (Kharadi) आणि चंदननगर (Chandannagar) परिसरात सुरु असलेल्या पणती पोकळी सोरट जुगार अड्ड्यावर (Gambling Den) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell) छापा टाकून 17 जणांना ताब्यात घेऊन 23 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई (Pune Crime News) बुधवारी (दि.8) करण्यात आली.

 

खराडी, चंदननगर परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये काही जण बेकायदेशीर पणती पोकळी सोरट जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला समजली. त्यानुसार पथकाने पाळत ठेवून छापा टाकला. त्यावेळी काहीजण पैसे लावून जुगार खेळत व खेळवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी 17 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जुगारातील रोख रक्कम 23 हजार 370 व जुगाराचे साहित्य जप्त केले. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींवर चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा (FIR) दाखल करुन पुढील कारवाईसाठी चंदननगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे,
अजय राणे, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, हणमंत कांबळे, इरफान पठाण, संदीप कोळगे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Crime Branch raided gambling dens in Kharadi and Chandannagar areas, action taken against 17 people

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | माथाडीच्या नावाखाली खंडणी मागणारा गुन्हे शाखेकडून गजाआड

Solapur Crime News | शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला दुचाकीची धडक, एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

 

 

Related Posts