IMPIMP

Solapur Crime News | शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला दुचाकीची धडक, एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

by nagesh
Solapur Crime News | balasaheb shivsena mla shahajibapu patil convoy met with an accident

सांगोला/सोलापूर :  सरकारसत्ता ऑनलाईन – Solapur Crime News | शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shinde Group MLA Shahajibapu Patil) यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाला (Police Vehicle) अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू (Death) झाला तर त्याचा जोडीदार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना (Solapur Crime News) गुरुवारी (दि.9) दुपारी साडेचारच्या सुमारास सांगोला तालुक्यातील माळवाडी-नाझरे दरम्यान घडली.

 

अशोक नाना वाघमारे (वय-50 माडगुळे, ता. आटपाडी, जि. सांगली) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर त्यांच्या सोबत पाठिमागे बसलेले नाना आमोणे (रा. एखतपूर, ता. सांगोला) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणाऱ्या सांगोला ग्रामीण रुग्णालयातील (Sangola Rural Hospital) सूत्रांनी सांगितले. (Solapur Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शहाजीबापू पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त नाझरे येथे
आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास भेट देण्यासाठी गेले होते.
तेथून सांगोल्याकडे परत येत असताना नाझरे गावच्या पुढे त्यांच्या गाडीपुढे संरक्षणासाठी असलेल्या
पोलिसांच्या स्कार्पिओ गाडीवर समोर विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी आदळली.
यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला असून शहाजीबापू यांच्या ताफ्यातील कोणालाही इजा झालेली नाही.

 

Web Title :- Solapur Crime News | balasaheb shivsena mla shahajibapu patil convoy met with an accident

 

हे देखील वाचा :

Sidharth Malhotra – Alia Bhatt | आलिया भट्टने दिल्या एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राला लग्नाच्या शुभेच्छा; त्यावर सिद्धार्थने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Pune Kasba Peth Bypoll Election | महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा शुभारंभ; रासने म्हणाले – ‘हा शुभारंभ विक्रमी विजयाकडे घेऊन जाणारा’

Chinchwad Bypoll Election | राहुल कलाटेंची मनधरणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंची एन्ट्री, खास व्यक्तीकडून धाडला निरोप; राहुल कलाटे अर्ज मागे घेणार?

 

Related Posts