IMPIMP

Pune Crime News | पुणे : सोसायटीची जागा स्वतःची असल्याचे सांगितले, पैसे घेऊन तरुणाची आर्थिक फसवणूक; दाम्पत्यावर FIR

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | धनकवडी येथील पंचवटी सोसायटीच्या समोर असलेली सोसायटीच्या मालकीची जागा स्वत:च्या मालकीची आहे, असे सांगून एका दाम्पत्याने तरुणासोबत भाडे करार करुन 74 हजार रुपये घेऊन फसवणूक (Cheating Fraud Case) केली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Pune Police) दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 मे 2022 ते 9 जुलै 2022 दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत लखन शशिकांत निकाळजे (वय-29 रा. पंचवटी सोसायटी गेट नं. 2 समोर, चव्हाणनगर, धनकवडी) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) सोमवारी (दि.13) फिर्याद दिली आहे. त्यावरुन रामदास छगन लगड (वय-42) व मनिषा रामदास लगड (दोघे रा. दत्तनगर चौक, आंबेगाव रोड) यांच्यावर आयपीसी 420, 504, 506/1, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडी येथील चव्हाणनगर मध्ये पंचवटी सोसायटी आहे. या सोसायटीच्या समोर मोकळी जागा असून ती जागा पंचवटी सोसायटीची आहे. असे असताना आरोपी लगड दाम्पत्याने ही जागा आपल्या मालकीची असल्याचे फिर्यादी निकाळजे यांना भासवले.
त्यांच्यासोबत भाडे करार केला. त्यांना डिपॉझिट आणि भाड्याचे पैसे तसेच शेडला लागणारे
साहित्य असे एकूण 74 हजार रुपये घेत निकाळजे यांची आर्थिक फसवणूक केली.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला होता.
या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे संदेश देशमाने (PI Sandesh Deshmane) करीत आहेत.

Related Posts