IMPIMP

Pune Crime News | अनधिकृतरित्या शाळा सुरु करुन पालकांकडून उकळले भरमसाठ पैसे, पुण्यातील धक्कादायक प्रकार

नऱ्हे येथील आर्यन पब्लिक स्कुलच्या संस्थाचालकासह मुख्याध्यापीकेवर FIR

by sachinsitapure
Aryan Public School Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | शाळा सुरु करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी तसेच कोणत्याही कादपत्रांची पुर्तता न करता शाळा सुरु केली. शाळेत मुलांना प्रवेश देण्याच्या नावाखाली पालकांकडून भरमसाठ पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नऱ्हे येथील आर्यन पब्लिक स्कुलच्या (Aryan Public School) संस्थाचालकासह शाळेच्या मुख्याध्यापीकेवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत अशोक श्रीरंग गोडसे (वय-50 रा. मगरपट्टा, हडपसर) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार आर्यन पब्लिक स्कूलचे संस्थाचालक आर्यन सुर्यवंशी उर्फ संतोष चौरे (Aryan Suryavanshi alias Santosh Chaure) व मुख्याध्यापीका माधुरी सुर्यवंशी (Principal Madhuri Suryavanshi) व इतरांवर आयपीसी 420, 465, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 16 जून 2022 ते 11 ऑक्टोबर 2023 दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे येथील आर्यन पब्लिक स्कुलच्या संस्थापक व शाळेच्या मुख्याध्यपीका व इतरांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचा भंग केला. आरोपींनी शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी तसेच कोणत्याही कागदपत्रांची पुर्तता न करता शाळा सुरु ठेवली. शाळेत अनधिकृतरित्या विद्यार्थ्यांची भरती करुन पटावर नोंदणी करुन घेतली. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी पालकांकडून अनधिकृतरित्या भरमसाठ फी वसूल केली. (Pune Crime News)

शाळा अनाधिकृत (School Unauthorized) असताना आरोपींनी अधिकृत असल्याचे भासवून विद्यार्थ्यांचे
दाखले व इतर कागदपत्रे ताब्यात घेतली. तसेच इतर शाळांकडे शाळा सोडल्याचे दाखले मागून शासनाचा महसूल बुडवला.
शासनाची, पालकांची व विद्यार्थ्यांची फसवणूक (Cheating Fraud Case)
केल्याप्रकरणी संस्थाचालक आर्य़न सुर्यवंशी उर्फ संतोष चौरे,
मुख्याध्यापीका माधुरी सुर्यवंशी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक यादव (API Yadav) करीत आहेत.

Related Posts