IMPIMP

Pune Crime News | रिक्षाचालकांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, स्वारगेट परिसरातील घटना; 4 जणांना अटक

by sachinsitapure
Swargate Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | रिक्षा घेऊन पळून जात असताना रिक्षचालकांनी केलेल्या बेदम मारहाणीत (Beating) एका 26 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू (Death) झाला होता. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी (Pune Police) केलेल्या तपासात हा खून (Murder In Pune) असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी चार रिक्षाचालकांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.24) रात्री सात ते आठ या दरम्यान गणेश क्रिडा येथील सार्वजनिक रोडवर घडली होती. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत पोलीस उपनिरीक्षक अशोक दिनकर पाटील PSI Ashok Dinkar Patil (वय-32) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर सचिन राजेंद्र नाईक Sachin Rajendra Naik (वय-32 रा. आदर्शनगर, धनकवडी), गणेश राजेंद्र नाईक Ganesh Rajendra Naik (वय-36 रा. आंबीलवाडा, सदाशिव पेठ), अमोल वसंत घोलप Amol Vasant Gholap (वय-38 रा. शनीनगर मस्जिद शेजारी, जांभुळवाडी, कात्रज), प्रकाश सखाराम घाटे Prakash Sakharam Ghate (वय-20 रा. स्वारगेट रिक्षा स्टँड जवळ) यांच्यावर आयपीसी 302, 34 सह महाराष्ट्र पोलीस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी रिक्षाचालक आहेत. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट पोलीस ठाण्यात अकस्मात मृतूची नोंद करण्यात आली होती.
पोलिसांनी तपासादरम्यान प्रत्यक्ष साक्षीदारांचे जबाब घेतले. तसेच घटनास्थळ वस्तुनिष्ठ पुरावे व गोपनीय माहिती घेतली.
त्यावेळी मयत अनोळखी तरुण आरोपींपैकी एकाची रिक्षा घेऊन पळून जात होता.
त्यावेळी आरोपींनी त्याला पकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.
यामध्ये गंभीर जखमी होऊन 26 वर्षाचा अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला.
पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींनी संगनमत करुन तरुणाचा खून केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कोलंबीकर (API Kolambikar) करीत आहेत.

Related Posts