IMPIMP

Pune Crime News | जेल कर्मचार्‍याच्या आत्महत्येचे कारण आले पुढे; प्रेमिकासह सहा जणांवर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | jail workers suicide cause comes forward a case has been registered against six people including girlfriend

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | लग्न झाल्यानंतर पुन्हा ड्युटीवर हजर राहिल्यानंतर आठ दिवसात स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या (Suicide by Shooting Himself) केलेला जेल कर्मचारी अमोल मुरलीधर माने Amol Muralidhar Mane (वय २८) याच्या मृत्यु मागील कारण समोर आले आहे. प्रेमसंबंधातून (Love Affair) त्याने ही आत्महत्या (Pune Suicide News) केली होती. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerwada Police) त्याच्या प्रेमिकेसह (Girlfriend) सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पल्लवी दिनकर धुमाळ (रा. जेल वसाहत), दिनकर रंगोबा धुमाळ Dinkar Rangoba Dhumal (वय ५७, रा. विजय पार्क, विद्यानगर), प्रतिक दिनकर धुमाळ (Pratik Dinkar Dhumal), रोहिदास मुरलीधर निगडे Rohidas Muralidhar Nigde (वय ५२), सोहम निगडे, रोहित साहु लॅबवाला (Rohit Sahu Labwala) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक भगवान सदाशिव गुरव (PSI Bhagwan Sadashiv Guruv) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५१५/२३) दिली आहे. हा प्रकार येरवडा कारागृहात (Yerwada Jail) २७ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचार वाजता घडला होता. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल माने आणि पल्लवी धुमाळ यांचे प्रेमसंबंध होते. पल्लवी हिने लग्नास नकार दिला होता. दरम्यान इतरांनी अमोल याच्या रुमवर जाऊन येथून निघून जा, तुला सस्पेंड करीन, नोकरीवरुन काढीन, अशी धमकी देऊन शिवीगाळ करुन मानसिक त्रास देत होते. तसेच पोलिसात तक्रार दिल्यास तू एकटाच येथे राहत आहेस, मारुन टाकील अशी धमकी देत होते.

त्यानंतर अमोल माने याचे दुसर्‍या मुलीसोबत लग्न झाले. लग्नासाठी तो आपल्या गावी नगरला गेला होता.
जानेवारी महिन्यात त्याचे लग्न झाले. सुट्टीनंतर तो परत आला. तेव्हा आरोपींनी अमोल यास तु लग्न कसे काय केले.
तुझी बदनामी करतो, खोटा गुन्हा दाखल करतो, असे बोलून मारहाण (Beating) केली. त्यातून त्याच्यावर दडपण आले होते.
२७ फेब्रुवारी रोजी तो गार्ड ड्युटीवर असताना त्याने स्वत: जवळच्या एस एल आर मधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली.
मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक कांचन जाधव (PI Kanchan Jadhav) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | jail workers suicide cause comes forward a case has been
registered against six people including girlfriend


हे देखील वाचा

Related Posts