IMPIMP

Pune Crime News | वंशाच्या दिवट्यासाठी जुळ्या मुलींचा वडील व आजी-आजोबांकडून खून ; पुण्यातील धक्कादायक घटना

by nagesh
Pune Crime News | Killing the twin girls out of lust for a son; A case of murder has been registered against the four including the husband

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मुलाच्या हव्यासापोटी त्यांनी गर्भवती सूनेला मुले गोरे होण्याकरीता वेगवेगळ्या गोळ्या खाण्यास दिल्या. तरीही जुळ्या मुली झाल्यानंतर या मुलींना झोपेत दुध पाजून त्यांना मारुन टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार (Court Orders) हडपसर पोलिसांनी (Pune Police) खूनाचा (Murder Case) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

जुळ्या मुलींचे वडिल अतुल बाबासाहेब सूर्यवंशी (Atul Babasaheb Suryavanshi), सासरे बाबासाहेब सूर्यवंशी Babasaheb Suryavanshi (वय ६२), जयश्री बाबासाहेब सूर्यवंशी Jayshree Babasaheb Suryavanshi (वय ५५), दीर अमोल बाबासाहेब सूर्यवंशी Amol Babasaheb Suryavanshi (वय २६, सर्व रा. शिवकृपा हरपळे वस्ती, फुरसुंगी – Harpale Vasti Fursungi) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी श्रीकृष्णा प्रताप लोभे (वय ३५, रा. वाघोली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०५५/२३) दिली आहे. हा प्रकार डिसेबर २०१८ ते २६ नोव्हेबर २०१९ व ६ फेब्रुवारी २०२० रोजी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण उर्मिला अतूल सूर्यवंशी यांना मुलगाच हवा या कारणामुळे त्यांना मानसिक त्रास देऊन मुले गोरे होण्याकरीता त्यांना वेगवेगळ्या गोळ्या खाण्यास दिल्या. त्यानंतरही त्यांना जुळ्या मुली झाल्या. बाळंतपणानंतर सहा महिन्यांनी त्या दोन्ही मुलींसह सासरी आल्या. उर्मिला हिने २६ नोव्हेबर २०१९ रोजी मुलींना दुध पाजून झोपवले असतानाही त्यांच्या पतीने त्या मुली झोपेत असताना सिद्धी (वय ७ महिने) हिला बाहेरील दुध पाजले. त्यामुळे तिचा मृत्यु झाला. अशाच प्रकारे ६ फेबुवारी २०२० रोजी दुसरी मुलगी रिद्धी (वय ९ महिने) हि झोपली होती. त्यामुळे त्यांच्या सासूने उर्मिला हिला स्वयंपाक घरात जाणिवपूर्वक कामाला लावले. अतुल सूर्यवंशी याने झोपलेले मुलीला बाहेरील दुध पाजून तिला जीवे ठार मारले. (Pune Crime News)

मुली झोपेत असल्याने पाजलेले दुध श्वास नलिकेत गेल्याने त्यांचा श्वास गुदमरुन मृत्यु (Death) झाला.
याबाबत फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. पण, पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक संदीप शिवले (PI Sandip Shivale) तपास करत आहेत.

दरम्यान, अतुल सूर्यवंशी याने फिर्यादी यांची बहिण उर्मिला सूर्यवंशी हिला घेऊन कारने पौडकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात
झाल्याचे दर्शविले. या घटनेत उर्मिला सूर्यवंशी यांचा मृत्यु झाला. याबाबतही फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली असून त्याची
सुनावणी सध्या सुरु आहे.

Web Title : Pune Crime News | Killing the twin girls out of lust for a son; A case of murder has been registered against the four including the husband

Related Posts