IMPIMP

Pune Crime News | कोंढवा : भाईच्या परवानगीशिवाय मंडप कसा टाकला?; हॉटेलबाहेर शेड टाकल्याने 3 लाखांची खंडणी मागणार्‍यांवर गुन्हा दाखल

by nagesh
 Pune Crime News | Pune Crime News : Kondhwa Police Station - Woman raped at gunpoint; Atrocities committed for demanding return of 4 crores invested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | रमजान महिन्यात हॉटेल चालू केले. हॉटेलच्या बाहेर मंडप टाकल्याने ३ लाखांची खंडणी (Extortion Case) मागणार्‍या दोघा गुंडांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. समीर पठाण (Sameer Pathan) आणि अन्वर (रा. कोंढवा – Kondhwa News) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी मार्केटयार्ड येथे राहणार्‍या एका ४९ वर्षाच्या व्यावसायिकानी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३४६/२३) दिली आहे. हा प्रकार फिर्यादीचे हॉटेलजवळ व आरोपीच्या ऑफिसमध्ये १५ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ७ व रात्री ९ वाजता घडला. (Pune Crime News)

 

फिर्यादी यांनी कोंढवा परिसरातमध्ये रमजान महिन्यामध्ये एक मोकळी जागा भाड्याने घेऊन तेथे हॉटेल चालवित आहे.
या वर्षीच्या रमजान महिन्याचे हॉटेल चालू करायचे असल्याने त्यांनी पारगेनगर येथे जागा भाड्याने घेऊन तेथे शेड मारण्याचे काम करत होते.
यावेळी अन्वर हा त्या ठिकाणी आला.
भाईच्या परवानगीशिवाय तू मंडप का टाकलास, तुला ते जड जाईल, अशी धमकी देऊन भाईला भेटायला सांगितले.
त्यामुळे फिर्यादी हे समीर पठाण याच्या ऑफिसमध्ये गेले. तेव्हा समीर पठाण याने तुझ्याकडे भरपूर पैसा आहे.
तु ३ लाख भाडे देऊ शकतोस. माझे नागरिक अधिकार मंच या संघटनेसाठी ५ लाख रुपये दे, म्हणाला.
त्यानंतर ३ लाख रुपये खंडणी (Ransom Case) मागून फिर्यादी यांना शिवीगाळ केली.
पैसे न दिल्यास तू ५ ते ६ महिने बाहेर फिरु शकणार नाहीस, अशी धमकी दिली.
सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे (Assistant Police Inspector Suravse) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Kondhwa: How did you put up the mandap without your brother’s permission?; A case has been filed against those who demanded an extortion of 3 lakhs for putting a shed outside the hotel

 

हे देखील वाचा :

NABARD Credit Seminar Mumbai | शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mula-Mutha Riverfront Project | मुळा-मुठा नदीकाठ सुधार योजनेविरोधात सारंग यादवाडकर यांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली

Pune RTO | गौण खनिजाची वाहतूक करताना ताडपत्रीचे आच्छादन करण्याचे आवाहन

 

Related Posts