IMPIMP

Pune Crime News | तलवार, कोयत्याने वार करुन तरुणाचा मंगला थिएटरबाहेर निर्घुण खून; टोळी वर्चस्वातून केला खून

by sachinsitapure
Pune Crime News | Murder of young man outside Mangala theater by stabbing him with sword, koya; Killed by gang dominance

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पूर्व वैमनस्यातून दहा ते बारा जणाच्या टोळक्याने तलवार, कोयत्याने सपासप वार करुन एका तरुणाचा निर्घुण खून (Murder Case) केला. मंगला चित्रपटगृहाजवळ (Mangala Cinema) बुधवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

नितीन म्हस्के असे खून (Murder in Pune) झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिसांनी (Pune Police) सागर कोळानट्टी ऊर्फ यल्ल्या Sagar Kolanatti alias Yallya (वय ३२), मलिक कोळ्या ऊर्फ तुंड्या Malik Kolya aka Tundya (वय २४), इम्रान शेख (वय ३२), पंडित कांबळे (वय २७), विवेक नवधर ऊर्फ भोला Vivek Navdhar alias Bhola (वय २४), लॉरेन्स पिल्ले (वय ३३), सुशील सूर्यवंशी (वय ३०), मनोज हावळे ऊर्फ बाबा Manoj Howle alias Baba (वय २५), आकाश गायकवाड ऊर्फ चड्डी Akash Gaikwad aka Chaddi (वय २४), रोहन ऊर्फ मच्छी मल्लेश तुपधर Rohan alias Macchi Mallesh Tupdhar (वय २०), विवेक भोलेनाथ नवधरे Vivek Bholenath Navdhare (वय २७), अक्षय ऊर्फ बंटी साबळे Akshay alias Bunty Sable (वय २१), विशाल भोले (वय ३०, सर्व रा. ताडीवाला रोड) यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सतिश आनंदा वानखेडे (वय ३४, रा. ताडीवाला रोड) याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७१/२३) दिली आहे. (Pune Crime News)

ताडीवाला परिसरात टोळीच्या वर्चस्वावरुन दोन टोळ्यांमध्ये वारंवार भांडणे होत होती.
फिर्यादी व नितीन म्हस्के हे गदर २ चित्रपट पाहण्यासाठी मंगला चित्रपटगृहात आले होते. हे यल्ल्याच्या टोळीला समजले.
ते चित्रपट सुटण्याची वाट पहात आऊट गेटला दबा धरुन बसले होते.
मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास चित्रपट सुटल्यानंतर नितीन म्हस्के हा बाहेर आल्यावर लोकांच्या गर्दीत
त्यांनी नितीनला घेरले. त्याच्यावर डोक्यात, मानेवर तलवार, पालघन, लोखंडी गज, काठ्या व फरशीच्या तुकड्यांनी
सपासप वार केले. त्याचा जागीच मृत्यु झाला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill), सुहेल शर्मा,
सहायक पोलीस आयुक्त वसंत कुवर (ACP Vasant Kuvar), सहायक आयुक्त नंदा पाराजे
(Assistant Commissioner Nanda Paraje), वरिष्ठ पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे
(Senior PI Dhanyakumar Godse), शब्बीर सय्यद, विक्रम गौड हे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.

 

Related Posts