IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | धक्कादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ब्लेडने वार करुन मित्राचा केला खून, गुप्तांग कापून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकला

by sachinsitapure
Pune Pimpri Chinchwad Crime News | man stabbed to death for abusing by his two friends in pimpri chinchwad crime news

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मद्यपान करत असताना मित्राने शिवीगाळ (Abuse) केल्याने त्याचा ब्लेडने सपासप वार करुन खून (Murder) केला. त्यानंतर त्याचे गुप्तांग कापून मृतदेह दगड बांधून एका विहिरीत फेकून दिला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली असून याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी अभिषेक उर्फ डल्ल्या मसु गायकवाड (वय-20 रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) याला अटक (Arrest) केली आहे. तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. गणेश उर्फ दाद्या भगवान रोकडे (वय-18 रा. बौद्धनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत गणेश हे तिघेजण मित्र (Friend’s) होते. बुधवारी मध्यरात्री चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ (Chinchwad Railway Station) असलेल्या मैदानात तिघे दारु पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि याच वादातून गणेशने अभिषेकला शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्याच्या रागातून मद्यधुंद असलेल्या अभिषेक आणि अल्पवयीन मुलाने गणेशवर ब्लेडने आणि धारदार शस्त्राने वार करुन खून केला. त्यानंतर त्याचे गुप्तांग (Private Parts) कापले. पुरवा नष्ट करण्यासाठी आरोपींनी गणेशचे कपडे काढून त्याला दगड बांधून विहीरीमध्ये फेकून दिले. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

दरम्यान, आरोपी अभिषेक आणि अल्पवयीन मुलगा हे सोसायटीमध्ये घरफोडी (Burglary) करण्यासाठी गेले होते.
त्याठिकाणी नागरिकांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
या घटनेचा तपास करत असताना आरोपींनी त्यांच्या मित्राचा शनिवारी खून केल्याचे उघड झाले.
दरम्यान बेपत्ता झालेल्या गणेशचा शोध त्याचे नातेवाईक घेत होते.
चिंचवड येथील रेल्वे स्थानकाजवळ विहिरीत गणेशचा मृतदेह आढळला.
गणेशच्या कुटुंबाने देखील आरोपींवर आरोप केला होता. आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असल्याची माहिती चिंचवड पोलीस ठाण्याचे (Chinchwad Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे (Senior PI Krishnadev Kharade) यांनी दिली.

Related Posts