IMPIMP

Pune Crime News | पुणे : ओएलएक्सवर फर्निचर विकत घेण्याच्या नावाखाली 12 लाखांची फसवणूक

by sachinsitapure
Cheating Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | ओएलएक्सवर (OLX) जुने फर्निचर विक्रीकरता फोटो टाकणे एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे. फर्निचर विकत घेण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने (Cyber Crime) 11 लाख 72 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केली. याप्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै 2023 मध्ये पुण्यातील मोहंमदवाडी परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या घरात ऑनलाईन घडला. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत मोहम्मदवाडी येथे राहणाऱ्या 52 वर्षीय व्यक्तीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) सोमवारी (दि.27) फिर्याद दिली आहे. यावरुन 93662XXXXX क्रमांकाच्या मोबाईल धारकावर आयपीसी 419, 420 सह आयटी अॅक्ट 66 डी नुसार गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलिसांनी हा गुन्हा कोंढवा पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या राहत्या घरातील जुने फर्निचर विकायचे होते. यासाठी त्यांनी फर्निचरचा फोटो ओएलएक्स या वेबसाईटवर पोस्ट केला. त्यानंतर 93662XXXXX या मोबाईल धारकाने फिर्यादी यांना संपर्क करुन फर्निचर विकत घेयचे असल्याचे सांगितले. तसेच ओएलएक्स वेबसाईटवर टाकलेला फोटो डिलीट करण्यास सांगून फोटो डिलीट करण्यासाठी एक लिंक पाठवली.

त्यानंतर एक अ‍ॅप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगून फिर्य़ादी यांच्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस घेतला.
सायबर गुन्हेगाराने फिर्यादी यांच्या बँक खात्यावरुन पाच लाख रुपये कर्ज मंजुर करुन घेतले.
त्यानंतर फिर्यादी यांच्या बँक खात्यातून विविध बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करुन 11 लाख 72 हजार रुपयांची फसवणूक केली.
पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Related Posts